UPSC Result 2021: अल्पदृष्टी असलेल्या आनंदा पाटीलने UPSC परिक्षेत मारली बाजी

UPSC Result 2021: अल्पदृष्टी असलेल्या आनंदा पाटीलने UPSC परिक्षेत मारली बाजी

UPSC Result 2021: अल्पदृष्टी असलेल्या आनंदा पाटीलने UPSC परिक्षेत मारली बाजी

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच युपीएससीचा(UPSC Result 2021) निकाल शुक्रवारी जाहीर झाला यात राज्यातील 100 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. तसेच यूपीएससी परिक्षेत अल्पदृष्टी असलेल्या आनंदा पाटील देशात 352 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत कोल्हापूरच्या शिरेपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. आनंदाचा यूपीएससी सारखी परिक्षा क्रॅक करण्याचा प्रवास म्हणावा तितका सोप्पा नव्हता. अल्पदृष्टी असल्याने त्याला इतरांच्या तुलनेत परिक्षेचा अभ्यास करताना खूप मेहनत घ्यावी लागली.(Ananda patil crack upsc exam)

आंनदाने ऑडिओ क्लिप ऐकून आणि कुटुंबीय,मित्राच्या मदतीने अभ्यास केला. पहिल्या दोन प्रयत्नानंतर काहीश्या गुणांनी हुलकावणी दिली होती.मात्र आनंदाने प्रयत्न सोडले नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करत त्याने जोमाने अभ्यासाला सुरूवात केली. आणि शेवटी त्याला त्याचं फळ मिळालं.

गारगोडी येथील नूतन मराठी शाळेमध्ये आनंदा पाटीलने प्राथमिक शिक्षण घेतले, पुढे त्याने आंबोली येथली डायनामिक इंग्लिश स्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. मैनी विद्यापीठाच्या आयसीआरईमधून इंजिनियरींग डिप्लोमा केल्यानंतर इस्लामपूर येथील आरआयटी विद्यालयात 2017 साली आनंदने बी टेक पदवी संपादन केली. या सर्वानंतर आनंदाने यूपीएससीच्या तयारीला सुरूवात केली. साल 2018 मध्ये आनंदा UPSC ची मुख्य परीक्षा पास झाला. तसेच यानंतर त्याला 2019 साली अपयशाचा सामना करावा लागला मात्र खचून न जाता त्याने जोमाने अभ्यासाला सुरूवात करत घवघवीत यश संपादन केलं आहे.

वयाच्या तिसऱ्या वर्षी आनंदाच्या दोनही डोळ्यांचे ऑपरेशन झाले होते. ऑपरेशनंतरही त्याला समस्या उद्भवू लागल्या. आनंदाला प्रत्येक अक्षर ब्रॉड करुन पहावं लागत असे. तसेच फळ्यांवरील अक्षरेही दिसण्यास त्रास होऊ लागला. अशा परिस्थितीत देखील आनंदानी मिळवलेलं यश अत्यंत प्रेरणादायी आहे असं म्हणावं लागेल


हे हि वाचा – Arogya Vibhag Bharti 2021 : मग फडणवीस आणि ठाकरे सरकारमध्ये फरक काय ? रोहित पवारांचा सरकारला घरचा आहेर

First Published on: September 25, 2021 1:57 PM
Exit mobile version