घरताज्या घडामोडीArogya Vibhag Bharti 2021 : मग फडणवीस आणि ठाकरे सरकारमध्ये फरक काय...

Arogya Vibhag Bharti 2021 : मग फडणवीस आणि ठाकरे सरकारमध्ये फरक काय ? रोहित पवारांचा सरकारला घरचा आहेर

Subscribe

महाराष्ट्रात आयत्यावेळी आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया पुढे ढकलल्याने आता संपुर्ण राज्यातून विद्यार्थ्यांचा रोष सरकारने ओढावून घेतला आहे. महाविकास आघाडीत सत्ताधारी पक्षातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेच्या निमित्ताने ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या गोंधळामुळे आता फडणवीस आणि ठाकरे सरकारमध्ये काय फरक राहिल ? असाही प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

रोहित पवारांचा घरचा आहेर

मागील सरकारने आरोग्य भरती रखडवल्याने आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली. आपल्या सरकारने आरोग्य भरती सुरू केली पण गोंधळाचं वातावरण दिसतंय. असंच चालू राहिलं तर आधीच्या आणि आपल्या सरकारमध्ये काय फरक राहील? याचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा. तसंच पारदर्शकतेसाठी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या देखरेखीत परीक्षा घेण्याबाबत विचार व्हावा. सध्या प्रत्येक पदासाठी व प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी फी आकारली जाते, हे योग्य नाही. सरकारने यात लक्ष घालून परिक्षार्थींच्या हिताचा निर्णय घ्यावा, ही विनंती!

- Advertisement -

मोफत एसटी प्रवासाचा पर्याय देता येईल का ?

परीक्षा सुरळीत होणं आवश्यक होतं. अनेकांची आर्थिक स्थिती सामान्य आहे. परीक्षेला जाण्यासाठी त्यांनी उसने तर काहींनी व्याजाने पैसे आणले,परंतु आता त्यांना आर्थिक भुर्दंड बसलाय. त्यामुळं पुन्हा लवकर परीक्षा घ्यावी आणि त्यावेळी मोफत एसटी प्रवासाचा पर्याय देता येईल का,याचा विचार व्हावा.

- Advertisement -


हेही वाचा – Arogya Vibhag Bharti 2021 : आरोग्य विभागाच्या भरतीत दलालांचा ५ लाख ते १५ लाखांचा रेट – देवेंद्र फडणवीस


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -