मोदींना राज्यघटनाच माहित नाही – ओवेसी

मोदींना राज्यघटनाच माहित नाही – ओवेसी

सौजन्य- ANI

एमआयएमचे अध्यक्ष अकबरूद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यघटनाच माहित नसून त्यांनी ती वाचलीच नसल्याची टीका असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. तेलंगना सरकार दलितांचे हक्क चोरून बाबासाहेबांचा अपमान करत असल्याची टीका यावेळी असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. यापूर्वी मोदींनी केलेल्या टिकेला उत्तर देताना ओवेसी यांनी मोदींनी घटनेची १५ व १६ ही कलमं वाचावीत. तसेच कोणतंही वक्तव्य करण्यापूर्वी सुधीर आयोग, मिश्रा आयोग व सच्चर समितीचे अहवाल वाचावेत. तसेच घटना तज्ञ्जांशी बोलावे असा सल्ला देखील यावेळी असदुद्दीन ओवेसी यांनी दिला आहे.

यावेळी ओवेसींनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला. जानवेधारी काँग्रेस प्रमुखांना मुस्लीम म्हणजे काँग्रेसची मालमत्ता वाटते. पण, ते दिवस आता गेले अशा शब्दात अकबरूद्दीन ओवेसी यांनी राहुल गांधी यांच्यावर टिका केली आहे. मुस्लिम समाजाला काँग्रेसची गरज नाही. त्यामुळे आता निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव अटळ असल्याचं ओवेसी यांनी म्हणत थेट काँग्रेसला आव्हान दिलं आहे.

प्रचारसभेदरम्यान, असदुद्दिन ओवेसी यांचा भाऊ अकबरूद्दीन यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र  मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर देखील जोरदार हल्ला केला आहे. तेलंगणामध्ये डिसेंबर ७ रोजी मतदान होणार असून ११ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तेलंगणामधील विधानसभा निवडणुकीमध्ये सध्या प्रचारादरम्यान आरोप – प्रत्यारोप होताना दिसत आहेत. काँग्रेस, भाजप आणि एमआयएम एकमेकांना लक्ष्य करताना दिसत आहेत.

वाचा – एवढं मारेन की कानातून रक्त येईल – ओवेसी

First Published on: December 4, 2018 3:23 PM
Exit mobile version