Kabul Airport : काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गोळीबारात ५ नागरिकांचा मृत्यू, देश सोडण्यासाठी धडपड

Kabul Airport : काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गोळीबारात ५ नागरिकांचा मृत्यू, देश सोडण्यासाठी धडपड

afghanistan : काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गोळीबारात ५ नागरिकांचा मृत्यू, देश सोडण्यासाठी धडपड

अफगाणिस्तानवर तालिबान दहशतवादी संघटनेने संपूर्ण ताबा मिळवल्यानंतर आता युद्ध संपल्याची घोषणा केली आहे. यामुळे अफगाणिस्तानात तालिबनची सत्ता स्थापन झाली आहे. तालिबानने रविवारी राजधानी काबूलचा ताबा घेतला. यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांच्यासह उपराष्ट्रपती आणि अन्य राजकारण्यांनी देश सोडला. काबूलमध्ये तालिबानने कब्जा केल्यानंतर परदेशी नागरिकांनी अफगाणिस्तान सोडण्यास सुरुवात केली आहे. यात अनेक देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

लाखोंच्या संख्येने नागरिक देश सोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामुळे विमानतळ परिसरात देशातून पळ काढण्यासाठी धडपड सुरु आहे. अशातच काबूल विमानतळावर रविवारी रात्री गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबारात पाच नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी धावाधाव सुरु केली. यामुळे शहरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. या गोळीबाराचा भीषण आवाज ऐकू नागरिकांच्या मनात भीतीचे, दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण थांबवण्यात आले आहे. यामुळे हजारोंच्या संख्येने नागरिक विमानात अडकून बसले आहेत. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानमधून बाहेर पडणे नागरिकांना अवघड झाले आहे. या परिस्थितीतीची भीषणता दाखवणारे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काबूल विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर लोक जीव मुठीत घेऊन चालत आहेत. तर वाहनांची मोठी गर्दी झालीय. कसलाही विचार न करता अफगाणी नागरिकांना जीव वाचवण्यासाठी आता देश सोडणे हा एकमेव पर्याय शिल्लक असल्याचे दिसत आहे.


Afghanistan : अफगाणिस्तानवर तालिबानचे वर्चस्व, राष्ट्रपती भवनावर फडकला तालिबानी झेंडा

 

First Published on: August 16, 2021 2:11 PM
Exit mobile version