घरताज्या घडामोडीAfghanistan: काबुलकडे दिल्लीहून जाणारी सर्व उड्डाणे रद्द

Afghanistan: काबुलकडे दिल्लीहून जाणारी सर्व उड्डाणे रद्द

Subscribe

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानने (Taliban) प्रवेश केल्यानंतर परिस्थिती खूप बिकट झाली आहे. त्यामुळे सध्याची अफगाणिस्तानमधील परिस्थिती पाहता भारतीयांना स्वदेशात आणण्यासाठी केंद्र सरकारने मोहीम वेगाने सुरू आहे. काबुलमधून (Kabul) भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी दोन विमान स्टँडबायवर ठेवण्यास केंद्र सरकारने एअर इंडियाला (air india flights) सांगितले आहे. याशिवाय आज, सोमवारी काबुलला जाणारी एअर इंडियाचे विमान रिशेड्यूल केले. हे विमान रात्री साडे आठ ऐवजी दुपारी साडे बारा वाजता उड्डाण करणार होते. पण आता दिल्लीहून सुटणारी विमानं थांबवली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेच्यानुसार, एअर इंडियाने आपातकालीन ऑपरेशनसाठी (emergency evacuation) एक पथक तयार केले आहे, अशी भारत सरकारच्या सुत्रांकडून देण्यात आली आहे. काबुलहून भारतीयांना आणण्यासाठी दोन विमानांना क्रू सदस्यांसोबत स्टँडबायवर ठेवले आहे. सरकार अफगाणिस्तानवर नजर ठेवून आहे.

- Advertisement -

माहितीनुसार, शहरातील हिंसेमुळे काबुल विमानतळाला जाणारा रस्ता रविवारी बंद केला आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, प्रवाशांसोबत एअर लाईन्स कर्मचाऱ्यांना विमानतळावर पोहोचण्यास समस्या निर्माण होत आहेत. याशिवाय एअरलाईन्स कर्मचाऱ्यांसोबत संपर्क करणे कठीण झाले आहे. कारण शहरातील काही भागांमध्ये मोबाईल नेटवर्क काम करत नाही आहे. दरम्यान काबुलमधील हमीद करझई विमानतळावरील सर्व उड्डाणे निलंबित करण्यात आली आहेत. लोकांना विमानतळावर गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. काल, रविवार काबुलहून १२९ भारतीयांना सुरक्षित घेऊन एअर इंडियाचे (Air India) विमान AI244 दिल्लीत दाखल झाले होते.

- Advertisement -

हेही वाचा – Afghanistan:..म्हणून राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी सोडला देश; फेसबुक पोस्टद्वारे केल्या भावना व्यक्त 


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -