रेपो रेट वाढल्यामुळे बँक ऑफ बडोदाकडून ग्राहकांना झटका, कर्जाचे हप्ते वाढवले

रेपो रेट वाढल्यामुळे बँक ऑफ बडोदाकडून ग्राहकांना झटका, कर्जाचे हप्ते वाढवले

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या आठवड्यात रेपो रेट ०.५० टक्क्यांनी वाढवला होता. त्यामुळे साहजिकच कर्जाचे हप्ते वाढणार होते. याचा परिणाम आता जाणवायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, बँक ऑफ बडोदाने मार्जिनल कॉस्ट बेस्ड लँडिंग रेट ०.२० टक्क्यांनी वाढवले आहे. यामुळे कर्जाचे हप्ते वाढणार आहेत. (Bank of Baroda increases the marginal cost based landing Rate)

हेही वाचा…तर मिळणार नाही पेन्शन, अटल पेन्शन योजनेचा नियम बदलला

“आम्ही एमसीएलआर दरात वाढ करण्यास मान्यता दिली आहे. हे नवे दर १२ ऑगस्टपासून लागू होणार आहे. एक वर्षाचा बेंचमार्क एमसीएलआर ७.६५ टक्क्यांवरून ७.७० टक्के करण्यात आला आहे. बहुतांश ग्राहक कर्जांचे व्याजदर याच आधारावर निश्चित केले जातात,” बँक ऑफ बडोदाने बुधवारी शेअर बाजारात पाठवलेल्या माहितीत म्हटले आहे,

एक महिन्याच्या मुदतीच्या कर्जासाठी MCLR 0.20 टक्क्यांनी वाढवून 7.40 टक्के करण्यात आला आहे. त्याच वेळी, तीन महिने आणि सहा महिन्यांच्या कर्जासाठी MCLR 0.10 टक्क्यांनी वाढवून अनुक्रमे 7.45 आणि 7.55 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. MCLR वाढल्याने मुदत कर्जावरील हप्ता (EMI) वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतांश ग्राहक कर्जे किरकोळ किमतीवर आधारित कर्जदरावर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR वाढल्यामुळे वैयक्तिक कर्ज, वाहन आणि गृह कर्ज महाग होऊ शकते.

हेही वाचा – आरबीआयचा निर्णय : कर्ज महागले; रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉइंट्सची वाढ

दरम्यान, महागाईचे चटके दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहेत. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) गेल्या शुक्रवारी, ६ ऑगस्ट रोजी पुन्हा एका रेपो रेट वाढविण्याचा (RBI Repo Rate Hike) निर्णय घेतला. रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आल्याने रेपो दर 5.40 टक्के झाला आहे. तो आधी 4.90 टक्के होता. मे महिन्यापासून आरबाआयने केलेली ही तिसरी वाढ आहे. परिणामी, गृह, वाहन तसेच अन्य कर्ज आणखी महाग झाले आहे.

First Published on: August 11, 2022 5:12 PM
Exit mobile version