घरअर्थजगत...तर मिळणार नाही पेन्शन, अटल पेन्शन योजनेचा नियम बदलला

…तर मिळणार नाही पेन्शन, अटल पेन्शन योजनेचा नियम बदलला

Subscribe

केंद्र सरकाने अटल पेंशन योजनेसाठी (Atal Pension Scheme) आता नवी नियमावली जाहीर केली आहे. जे नागरिक इन्कम टॅक्स (Income Tax) भरतात त्यांना अटल पेंशन योजनेचा लाभ घेता येणार नाही. अर्थ मंत्रालयाने यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. १ ऑक्टोबरपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. (New rule for Atal pension scheme)

हेही वाचा धक्कादायक! फक्त १५ हजार रुपयांसाठी जस्ट डायलने ग्राहकांचा डाटा विकला

- Advertisement -

अर्थ मंत्रालयाने यासंदर्भात १० ऑगस्ट रोजी नवी नियमावली जाहीर केली आहे. जे नागरिक इन्कम टॅक्स भरतात किंवा याआधी ज्यांनी इन्कम टॅक्स भरला आहे त्यांना १ ऑक्टोबर २०२२ पासून अटल पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही, असं या आदेशात म्हटलं आहे. इन्कम टॅक्स अॅक्ट १९६१ नुसार आयकर दायित्व आहेत, ते इन्कम टॅक्स पेअर आहेत.

१ ऑक्टोबरपासून या नव्या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. इन्कम टॅक्स भरत असलेला किंवा याआधी इन्कम टॅक्स भरलेल्या व्यक्तीने जर १ ऑक्टोबरपासून अटल पेन्शन योजनेचा लाभ घेतला तर त्यांचं खातं तत्काळ बंद करण्यात येणार आहे. खातं बंद होण्याच्या तारखेपर्यंत त्या व्यक्तीच्या खात्यात जेवढे पैसे असतील तेवढे पैसे त्यांना तत्काळ दिले जातील. त्यानंतर त्यांचं खातं कायमचं बंद होईल.

- Advertisement -

हेही वाचा नोटाबंदी फसली? बोगस नोटांचा बाजारात पुन्हा सुळसुळाट

हा नवा आदेश लागू होण्याआधी जर तुम्ही अटल पेन्शन योजनेत नवं खातं खोलत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल. १८ ते ४० वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक अटल पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जर आधीपासूनच या योजनेसाठी अर्ज केला असेल किंवा पुढील महिन्यापर्यंत नव्याने अर्ज केला तरी नव्या आदेशाचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही. ४ जूनपर्यंत नॅशनल पेंन्शन योजना आणि अटल पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या लोकांची संख्या ५.३३ कोटी होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -