वाघा बॉर्डरवर ‘बिटिंग द रिट्रिट’ सोहळा रद्द

वाघा बॉर्डरवर ‘बिटिंग द रिट्रिट’ सोहळा रद्द

पाकिस्तानी सेनेच्या ताब्यात असलेले भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या स्वागताची वाघा बॉर्डरवर जोरदार तयारी करण्यात आली आहे. विंग कमांडर अभिनंदन यांच्या स्वागतासाठी वायुसेनेचं एक प्रतिनिधिमंडळ अटारी-वाघा सीमेवर आले आहे. मात्र त्यांच्या स्वागता दरम्यान ‘बिटिंग द रिट्रिट’ सोहळा ठेवण्यात आला होता. परंतु आजचा हा सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अभिनंदनच्या स्वागतासाठी मोठ्याप्रमाणात वाघा बॉर्डरवर गर्दी झाली असून सुरक्षितेच्या दृष्टीने बीएसएफने हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

काय आहे ‘बिटिंग द रिट्रिट’

‘बिटिंग द रिट्रिट’ हे पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने नागरिक वाघा बॉर्डरवर जमा होतात. ‘बिटिंग द रिट्रिट’ दरम्यान दोन्ही देशातील जवान मार्च करत बॉर्डरवर येतात. पाकिस्तानच्या दिशेने रेंजर्स तर भारताच्या दिशेने बीएसएफचे जवान एकत्र येतात आणि हा सोहळा करण्यात येतो. तसेच ‘बिटिंग द रिट्रिट’ या सोहळ्याची सुरुवात १९५९ पासून करण्यात आली आहे. तसेच १९६५ आणि १९७१ यावेळी झालेल्या भारत – पाकिस्तानच्या युद्धा दरम्यान देखील ‘बिटिंग द रिट्रिट’ सोहळा रद्द करण्यात आला होता.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानला चोखप्रत्युत्तर देण्यासाठी बुधवारी सकाळी सहा विमान पाकिस्तानला पाठवली होती. त्यातील पाच विमान परतली. मात्र या विमानामधील मिग – २१ हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत तांत्रिक बिघाडामुळे कोसळले होते. त्या दरम्यान या विमानाचे पायलट अभिनंदन वर्थमान हे वैमानिक पाकिस्तानाच्या तावडीत सापडले होते. मात्र भारताच्या दबावानंतर अभिनंदन यांना सोडणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली असून आज भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना सोडण्यात येणार आहे.


हेही वाचा – LIVE UPDATE : वर्थमान अभिनंदन वाघा बॉर्डरवर दाखल

हेही वाचा – दहशतवादाला फूस देणाऱ्यांविरोधात कारवाई व्हावी – सुषमा स्वराज


 

First Published on: March 1, 2019 4:25 PM
Exit mobile version