घरदेश-विदेशचीनकडून पाकिस्तानला धक्का, विमानसेवा केली रद्द

चीनकडून पाकिस्तानला धक्का, विमानसेवा केली रद्द

Subscribe

भारत-पाकिस्तानदरम्यान तणावाचे वातावरण आहे. यामध्ये चीनने भारताचा पाठिंबा दिला आहे. चीनकडून पाकिस्तानला जाणारी विमान सेवा काही काळासाठी रद्द करण्यात आली आहे.

पाकिस्तानद्वारे दहशतवादाचा हवा मिळत असल्याचे चित्र जगासमोर उघडे झाल्यानंतर सर्व देशांनी पाकिस्तानकडे पाठ फिरवली आहे. मागील अनेक वर्षांपासून पाकिस्तानची पाठराखण करणारा चीनने देखील पाकिस्तानला धक्का दिला आहे. चीन या हल्ल्यात भारताच्या बाजूने उभा असल्याचे चित्र दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवण्यासाठी चीनने आपल्या देशातून पाकिस्तानकडे जाणारी विमाने रद्द केली आहेत. चीनच्या या नियमामुळे पाकिस्तान देखील चकीत झाले आहे. विमान सेवा बंद केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. मसूद अजहर याला दहशतवादी करार देण्याच्या मागणीचे चीन समर्थन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. चीन भारतावर उदार होण्याचे नेमके कारण काय? या बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

नेमके काय आहे कारण

मागील काही वर्षांपासून चीन आणि पाकिस्तानमध्ये मैत्रीपूर्ण संबध आहे. चीन पाकिस्तानच्या मदतीने एक बंदर बनवत आहे. या बंदरामुळे चीन आणि संयुक्त अरब अमिरात यादरम्यानचे अंतर कमी होणार आहे. भारत पाकिस्तानदरम्यान तणावाच्या वातारणामुळे चीनचे आर्थिक नुकसान होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून चीन पाकिस्तानला आर्थिक मदत देत आहे. युद्धामुळे हा प्रकल्प नष्ट होण्याची भिती चीनला आहे. यामुळे पाकिस्तानने चीनची साथ सोडून भारताचा पाठिंबा दिला आहे. चीनने भारताला समर्थन केल्याचे हे एक मोठे कारण मानले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -