Bharat Bandh 2022 : जातीनिहाय जनगणनेसाठी आज भारत बंदची हाक: काय होणार परिणाम?

Bharat Bandh 2022 : जातीनिहाय जनगणनेसाठी आज भारत बंदची हाक: काय होणार परिणाम?

Bharat Bandh 2022 : जातीनिहाय जनगणनेसाठी आज भारत बंदची हाक: काय होणार परिणाम?

ऑल इंडिया बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटीज एम्प्लॉईज फेडरेशनने (All India Backward and Minority Communities Employees Federation) आज 25 मे रोजी भारत बंदची हाक दिली आहे. केंद्र सरकारने इतर मागास जातींची जातनिहाय जनगणना करावी या मागणीसाठी हा भारत बंद पुकारला आहे. या भारत बंदसाठी बहुजन मुक्ती पार्टी आणि ऑल इंडिया बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटीज एम्प्लॉइज फेडरेशन एकत्र काम करत आहे. त्यांना बहुजन क्रांती मोर्चाचाही पाठिंबा मिळाला आहे. (Bharat Bandh 2022)

भारत बंदला पाठींबा देणाऱ्यांची मागणी काय?

BAMCEF ने सर्व मुद्द्यांवर भारत बंदचे आवाहन केले असले तरी जात जनगणनेची ही प्रमुख मागणी आहे. मात्र केंद्राने इतर मागास जातींची जातीच्या आधारित जनगणनेस नकार दिल्याने BAMCEF भारत बंदची हाक दिली आहे. (Bharat Bandh 25 may)

१) जातीच्या आधारावर जनगणना

२) शेतकऱ्यांना हमी एमएसपी

३) निवडणुकीत ईव्हीएमचा वापर थांबवा

४) पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली आदिवासींचे विस्थापन होता कामा नये

५) NRC आणि CAA कायदा थांबवा

६) खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे

७) जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी

८) लोकांना लसीकरणासाठी सक्ती करु नये

भारत बंदला प्रमुख पक्षांचा पाठिंबा नाही

BAMCEF च्या जातीय जनगणनेच्या मागणीसाठी काही दलित राजकीय पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे, मात्र कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाचा पाठिंबा मिळालेला नाही. बामसेफचे अध्यक्ष वामन मेश्राम म्हणाले की, आमच्या भारत बंद आंदोलनाला राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन मुक्ती मोर्चा आणि इतर अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. आमची प्रमुख मागणी आहे की, जातींची संख्या मोजण्याची बाबही जनगणनेत समाविष्ट करावी. जात जनगणनेच्या मागणीसाठी बामसेफने दिलेल्या भारत बंदच्या आवाहनाला आतापर्यंत कोणत्याही प्रमुख पक्षाचा पाठिंबा मिळालेला नाही. तथापि, जात जनगणनेची मागणी करणारे सर्व पक्ष BAMCEF च्या निर्णयाला चांगले म्हणत आहेत, परंतु त्याबरोबर रस्त्यावर उतरणे आणि पाठिंबा देण्याचे टाळत आहेत. (Bharat Bandh on 25th May)

भारत बंदचे देशभरात परिणाम (Bharat Bandh)

या भारत बंदचा परिणाम दुकाने आणि सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती, त्यामुळे सर्वसामान्यांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते. भारत बंदचे आवाहन करणाऱ्या लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुकानदारांना बुधवारी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. मात्र या भारत बंदला कमी प्रतिसाद मिळताना दिसतोय.


राणा दाम्पत्याला दिलासा; खार येथील घरावर पुढील आदेशापर्यंत BMC ला कारवाई न करण्याचे आदेश

First Published on: May 25, 2022 2:52 PM
Exit mobile version