सोनिया गांधी ईडी कार्यालयात पोहोचल्या, सत्याग्रहाचे नाटक देश पाहत असल्याची भाजपची टीका

सोनिया गांधी ईडी कार्यालयात पोहोचल्या, सत्याग्रहाचे नाटक देश पाहत असल्याची भाजपची टीका

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आज ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. मनी लाँड्रिंगशी संबंधित नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीचे अधिकारी सोनिया गांधींना प्रश्नोत्तरे करनार आहेत. सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेसने सत्याग्रहाची घोषणा केली आहे. काँग्रेसच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

काँग्रेस सत्याग्रहाचे नाटक करत आहे –

सोनिया गांधी ईडी कार्यालयात हजर होण्यापूर्वी भाजपने काँग्रेसवर टीका केला आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी मंगळवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या सत्याग्रहावर निशाणा साधला आहे. पात्रा म्हणाले, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आज ईडीसमोर हजर होणार आहेत. या संपूर्ण विषयावर काँग्रेस पक्ष ज्या प्रकारचे वातावरण निर्माण करत आहे, ते संपूर्ण देश पाहत आहे. काँग्रेस करत असलेल्या सत्याग्रहाचे नाटक सारा देश पाहत आहे.

विरोधकांकडे मुद्दे नाहीत –

संबित पात्रा पुढे म्हणाले की, आज विरोधकांकडे मुद्द्यांचा अभाव आहे. बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या जानकर यांच्या घरातून २१ कोटी रुपयांची रोकड जप्त झाल्याचे तुम्ही बंगालमध्ये पाहिले आहे, तर आम आदमी पक्षाचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरातून पैसे जप्त करण्यात आले आहेत. अशा कारवायांवर न्यायालयाने कडक शेरेबाजी केली तर नॅशनल हेराल्ड 5 हजार कोटी रुपयांच्या प्रकरणाची चौकशी काय करू नये? विरोधकांना हे मुद्दे आवडत नाहीत म्हणून हे सगळे विषय फेटाळायचे का?

हे प्रकरण 5 हजार कोटींचे –

नॅशनल हेराल्ड प्रकरणात पाच हजार कोटींचा गंडा घातल्याचेही पात्रा म्हणाले. हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात गेले आहे, आज या प्रकरणी सोनियाजींचीही चौकशी केली जात आहे. सोनिया जींनी आज हे षडयंत्र कसे रचले गेले, मुख्य सूत्रधार कोण हे मान्य कले पाहीजे, असे संबित पात्रा म्हणाले.

First Published on: July 26, 2022 11:31 AM
Exit mobile version