मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला ‘हात’

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला ‘हात’

काँग्रेसच्या नगरसेवक, कार्यकर्त्यांचा पक्षाला रामराम

अखेर २४ तासानंतर मध्य प्रदेशमधील निकाल स्पष्ट झाले आहेत. राजस्थान आणि छत्तीसगडप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये देखील काँग्रेसला भाजपला धुळ चारली आहे. २४ तासानंतर मध्य प्रदेशातील चित्र स्पष्ट झाले असून २३० जागांपैकी काँग्रेसला ११४ जागा आणि भाजपला १०९ जागा मिळाल्या आहेत. तर समाजवादी पक्षाला १, बहुजन समाज पक्षाला २ आणि अपक्षांना ४ जागा मिळाल्या आहेत. या निकालाअंती काँग्रेसनं भाजपला धुळ चारल्याचं स्पष्ट झालं आहे. सत्ता स्थापनेसाठी ११६ ही मॅजिक फिगर आहे. पण, एकाही पक्षाला ११६ ही मॅजिक फिगर गाठता आलेली नाही, त्यामुळे सपा, बसपा आणि अपक्षांच्या निर्णयाकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसनं आता हालचाली सुरू केल्या आहेत. छत्तीसगड, राजस्थान आणि आता मध्य प्रदेशमध्ये देखील भाजपला सत्ता गमवावी लागली आहे. त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभा २०१९ची सेमीफायनल म्हणून या राज्यांच्या निवडणुकांकडे पाहिलं जात होतं. पण त्यामध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

वाचा – भाजपचे विमान जमिनीवर!

दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये भाजपनं देखील सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील राजकीय रंगत ही आणखीन वाढली आहे. दरम्यान, शिवराजसिंग चौहान हे राजीनामा देण्यासाठी राजभवनामध्ये दाखल झाले आहे.

वाचा – मोदींनी मला धडा शिकवला – राहुल गांधी

वाचा – शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली!

 

First Published on: December 12, 2018 11:16 AM
Exit mobile version