अखेर बृजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल; पॉस्कोसह अन्य कलमे लावली

अखेर बृजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल; पॉस्कोसह अन्य कलमे लावली

माझ्यावरील एकही आरोप सिद्ध झाला तर मी गळफास घेईन, असे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रृजभूषण शरण सिंह यांनी म्हटले आहे.

नवी दिल्लीः भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी रात्री उशीरा अखेर गुन्हा नोंदवला. पॉस्कोसह विविध कलमे सिंह यांच्यावर लावण्यात आली आहेत. त्यामुळे सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सिंह यांच्याविरोधात सात महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाची तक्रार केली होती. याचा गुन्हा नोंदवणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिली. त्यानुसार दिल्ली पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला.

न्यायालयाने गुन्हा नोंदवण्याचे आदेश देताच सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. सिंह म्हणाले, न्यायालयाच्या आदेशाने मी आनंदी आणि प्रसन्न आहे. दिल्ली पोलिसांना गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मी दिल्ली पोलिसांना तपासात सहकार्य करणार आहे. या देशात न्यायपालिकेपेक्षा कोणी मोठ नाही. मीही न्यायपालिकेपेक्षा मोठा नाही. आतापर्यंत गुन्हा दाखल झाला असेल किंवा दाखल होत असेल. मी न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत करतो, असे सिंह यांनी सांगितले.

मात्र बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विनेश फोगाट यांनी क्रिकेटपटूसह देशातील नामवंत खेळाडूंवर निराजी व्यक्त केली. ऑलिम्पिक आणि कॉमन वेल्थ स्पर्धेवर सोशल मीडियावर उघड भूमिका मांडणारे भारतातील स्टार क्रिकेटपटू आणि नामवंत खेळाडू कुस्ती महासंघातील लैंगिक शोषणावर गप्प का आहेत?, कोण काहीच का बोलत नाही, असा संतप्त सवाल विनेश फोगाटने केला.

First Published on: April 28, 2023 10:48 PM
Exit mobile version