West Bengal: बीरभूम हिंसेबाबत कोलकाता हायकोर्टाचे CBIला तपास करण्याचे आदेश

West Bengal: बीरभूम हिंसेबाबत कोलकाता हायकोर्टाचे CBIला तपास करण्याचे आदेश

West Bengal: बीरभूम हिंसेबाबत कोलकाता हायकोर्टाचे CBIला तपास करण्याचे आदेश

पश्चिम बंगालच्या (West Bengal) बीरभूम जिल्ह्याच्या (Birbhum) रामपुरहाटमध्ये तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या हत्येनंतर (TMC Leader Leader Murdered) संतप्त जमावाने संशयितांच्या काही घरांना आग लावली. या हिसेंमध्ये ८ जणांचा जिवंत जळून मूत्यू झाला. याच प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने (Calcutta High Court) मोठा निकाल दिला आहे. बीरभूम हिंसेबाबत कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआयला (Central Bureau of Investigation’s forensic) तपास करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशानंतर सीबीआयचे पथक तपास करण्यासाठी रामपूरहाटमध्ये पोहोचले आहे.

पुढील सुनावणी ७ एप्रिलला

 

दरम्यान या हिसेंच्या घटनेची कोलकाता उच्च न्यायालयाने बुधवारी स्वतः दखल घेतली होती आणि सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर त्याची सुनावणी सुरू आहे. आता या घटनेसंदर्भातील पुढील सुनावणी ७ एप्रिलला होणार आहे. याच दिवशी सीबीआय आपला प्राथमिक अहवाल सादर करेल.

उच्च न्यायालयाने एसआयटीला दिला आदेश

दरम्यान उच्च न्यायालयाने या घटनेचा तपास करत असलेल्या विशेष तपास यंत्रणेला (SIT) सर्व कागदपत्र आणि अटक व्यक्तींना सीबीआयकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय न्यायालयाने एसआयटीला पुढील तपास न करण्यास सांगितले आहे.

नेमके प्रकरण काय?

सोमवारी बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट भागात सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या ताब्यातील बरशल ग्राम पंचायतीचे उपप्रमुख भादू सेख यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. भादू सेख यांच्या हत्येची माहिती मिळताच टीएमसीचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यानंतर टीएमसीच्या समर्थकांनी घटनेच्या काही तासानंतर संशयितांच्या घरात आग लावली. यामध्ये ८ जणांचा जीवंतपणे जळून मृत्यू झाला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार राजकीय वैराचे प्रकरण असल्याचे म्हटले जातेय. या घटनेमुळे परिसरात तणावचे वातावरण पसरले होते. दरम्यान याप्रकरणात आतापर्यंत २२ जणांना अटक करण्यात आले आहे.


हेही वाचा – Birbhum Violence: हिंसाचारग्रस्त बीरभूमवासीयांना भेटल्या ममता बॅनर्जी, पीडित कुटुंबियांना ५ लाखांची मदत


First Published on: March 25, 2022 12:45 PM
Exit mobile version