Birbhum Violence: हिंसाचारग्रस्त बीरभूमवासीयांना भेटल्या ममता बॅनर्जी, पीडित कुटुंबियांना ५ लाखांची मदत

CM Mamata Banerjee visits Bengal village where 8 were burnt to death, announces Rs 5 lakh compensation
Birbhum Violence: हिंसाचारग्रस्त बीरभूमवासीयांना भेटल्या ममता बॅनर्जी, पीडित कुटुंबियांना ५ लाखांची मदत

बीरभूम जिल्ह्याच्या रामपुरहाटमध्ये झालेल्या हिंसेत ८ लोकांना जिवंत जाळल्याची चर्चा देशभरात होत आहे. यादरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज दुपारी हिंसेत मृत्यू झालेल्या कुटुंबियांना जाऊन भेटल्या. त्यांनी सर्व पीडित कुटुंबियांसोबत बातचीत केली आणि त्यांचे सांत्वन केले. ममता बॅनर्जी बोलत असतात अनेक कुटुंबांचे अश्रू अनावर झाले. त्यांनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान हत्या झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना बॅनर्जी यांनी ५ लाखांचा चेक दिला. तसेच आगीच्या घटनेत जळालेल्या लोकांच्या कुटुंबियांनी ५ लाखांची मदत केली. तर घरांच्या पुर्नबांधणीसाठी २ लाखांची मदत दिली. यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी याप्रकरणातील आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत सांगितले होते. त्या म्हणाल्या होत्या की, ‘हे बंगाल आहे, उत्तर प्रदेश नाही. आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल.’

नेमके प्रकरण काय?

सोमवारी बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट भागात सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या ताब्यातील बरशल ग्राम पंचायतीचे उपप्रमुख भादू सेख यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. भादू सेख यांच्या हत्येची माहिती मिळताच टीएमसीचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यानंतर टीएमसीच्या समर्थकांनी घटनेच्या काही तासानंतर संशयितांच्या घरात आग लावली. यामध्ये ८ जणांचा जीवंतपणे जळून मृत्यू झाला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार राजकीय वैराचे प्रकरण असल्याचे म्हटले जातेय. या घटनेमुळे परिसरात तणावचे वातावरण पसरले होते. दरम्यान याप्रकरणात आतापर्यंत २२ जणांना अटक करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

याघटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘मी पश्चिम बंगालमधील बीरभूममध्ये झालेल्या हिंसक घटनेबाबत दुःख आणि संवेदना व्यक्त करतो. मी आशा करतो की, राज्य सरकार, बंगालच्या महान धरतीवर असे पाप करणाऱ्यांना जरूर शिक्षा देईल.’


हेही वाचा – West Bengal: TMCच्या महिला नेत्याच्या पतीवर झाडली गोळी; तर महिला नगरसेविकेच्या अंगावर घातली गाडी