Covid-19 vaccine: १२ ते १५ वर्षांच्या मुलांनाही लस देणारा पहिला देश; कॅनडात Pfizer लसीला मंजूरी

Covid-19 vaccine: १२ ते १५ वर्षांच्या मुलांनाही लस देणारा पहिला देश; कॅनडात Pfizer लसीला मंजूरी

Corona Vaccine: फायझर

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, कॅनडाच्या आरोग्य विभागाने १२ ते १५ वर्षांच्या मुलांसाठी फायझर कंपनीच्या लसला मान्यता दिली आहे. कॅनडाच्या आरोग्य विभागाच्या मुख्य आरोग्य सल्लागार सुप्रिया शर्मा यांनी बुधवारी यासंदर्भातील माहिती दिली. ते म्हणाले की या निर्णयामुळे मुलांना कोरोनाच्या वातावरणात सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळेल. यापूर्वी १६ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांसाठी ही लस मंजूर केली गेली होती. यासह रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कॅनडाच्या आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ सल्लागार सुप्रिया शर्मा यांनी असे सांगितले की, “या तरुण वयोगटातील मुलांसाठी ही लस सुरक्षित आणि प्रभावी आहे, असे विभागाने ठरविले आहे.” कॅनडामध्ये १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींसाठी मंजूर केलेली ही पहिली लस आणि कॅनडा हा पहिला देश आहे.

यासह अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाकडून पुढील आठवड्यापर्यंत तरुणांना असलेल्या फायझर लसला मान्यताही मिळण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी बरेच मुलांना लसीचे डोस देण्याची तयारी आहे. आधीपासून ही लस १६ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना मंजूर झाली होती. या लसीमुळे तरूणांना संरक्षण देखील देण्यात आले होते. ज्यानंतर आता ही नवीन घोषणा करण्यात आली आहे.

फयझरने मार्चमध्ये सादर केलेल्या आकडेवारीनुसार, १२ ते ५ वर्षांच्या २ हजार २६० स्वयंसेवकांना लस देण्यात आली होती. १८ वर्षाच्या मुलांच्या तुलनेत १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला. त्यांच्यामध्ये एकालाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले नाही. सुप्रिया शर्मा यांनी सांगितले की, ही लस या वयोगटातील मुलांसाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे कॅनडामधील मुलांसाठी फायझरची लस देण्यास मंजूरी देण्यात आली आहे आणि कॅनडा हा पहिला देश आहे.

First Published on: May 6, 2021 11:04 AM
Exit mobile version