पंतप्रधान कार्यालयातून मुख्यमंत्र्यांना मिळाले बनावट पत्र

पंतप्रधान कार्यालयातून मुख्यमंत्र्यांना मिळाले बनावट पत्र

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान कार्यालयातील लेटरहेड्सचा गैरवापर होत असल्याची घटना समोर आली आहे. याचाच वापर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांचीही फसवणूक केली असल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पंतप्रधान कार्यालयातून तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने तक्रार नोंदवली आहे. २७ नोव्हेंबर २०१७ रोजी मुख्यमंत्री कार्यालयात हे लेटरहेड पाठवण्यात आले आहे होते. सीबीआयने या प्रकरणी तक्रार नोंदवली असून तपास सुरु केला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री कार्यालयात दोन बनावट पत्र पाठवण्यात आली होती. नवी मुंबईतील विलायती राम मित्तल याच्या वांद्रे येथील जागेच्या विकासासंदर्भात हे पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला मिळाले आहे. या प्रकरणी अद्याप कोणीही अधिकृत रित्या माहिती दिली नाही. मात्र हिंदूस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार या संदर्भात सीबीआय पूर्ण चौकशी करणार आहे.

डीआरडीओला ही मिळाले बनावट पत्र

पंतप्रधान कार्यालयातील लेटरहेडचा चुकीचा वापर विविध प्रशासकीय कार्यालयात करण्यात आला. संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) कार्यालयातही फॅक्सच्या माध्यमातून अशाच प्रकारचे पत्र मिळाले आहे. दरम्यान सीबीआय यंत्रणा याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

First Published on: March 1, 2019 2:19 PM
Exit mobile version