Chhattisgarh Maoist Attack: गृहमंत्री अमित शहांनी शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली

Chhattisgarh Maoist Attack: गृहमंत्री अमित शहांनी शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली

Chhattisgarh Naxal attack: गृहमंत्री अमित शहांनी शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली

छत्तीसगडमधील बिजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात २४ जवानांना वीरमरण आले. ७०० नक्षलवाद्यांच्या जमावाने जवांनावर बेझूट गोळीबार केला. या भ्याड नक्षलवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून संपात व्यक्त केला जात आहे. दरम्यान आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्तीसगडमध्ये दाखल झाले असून त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेलही त्यांच्यासह उपस्थित होते.

दरम्यान गृहमंत्री अमित शहा आता उपचारांसाठी दाखल केलेल्या जखमी जवानांची रायपूरमध्ये भेट घेत चौकशी करणार आहेत. त्यापाठोपाठ जगदलपूर, बिजापूर आणि रायपूरचा दौरा करणार आहेत. त्यानंतर एका उच्चस्तरीय बैठकीतही अमित शहा सहभागी झाले आहेत. या बैठकीत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह आयबी, सीआरपीएफ आणि राज्य पोलीस दलाचे प्रमुख अधिकारी उपस्थित आहेत. यावेळी या प्रकरणातील अधिक माहिती आणि पुढील रणणितीवर चर्चा होईल. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान काल झालेल्या या भ्याड नक्षलवादी हल्ल्याची माहिती मिळताच गृहमंत्री अमित शहा दिल्लीत दाखल झाले. तसेच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांच्या संपर्कात राहत प्रत्येक घडामोडीची माहिती घेत होते. तसेच सीआरपीएफच्या डीजींनाही तात्काळ बिजापूरमध्ये दाखल होण्याचे निर्देश दिले. यात नक्षलवाद्यांच्याविरोधात लढा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने नवी रणनिती तयार केली आहे. याचपार्श्वभूमीवर रविवारी रात्री उशीरा गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आय.बीचे संचालक, गृह सचिव, सीआरपीएफ आणि गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. दरम्यान आता केंद्र सरकार या घटनेनंतर छत्तीसगड पोलीस महासंचालकांच्या विस्तृत रिपोर्टच्या प्रतिक्षेत आहे.


 

First Published on: April 5, 2021 12:31 PM
Exit mobile version