छत्तीसगडमध्ये तिसऱ्या मुख्यमंत्र्याचा चेहरा दिसणार

छत्तीसगडमध्ये तिसऱ्या मुख्यमंत्र्याचा चेहरा दिसणार

छत्तीसगडचे मुख्यमंत्री

भारत सरकारने मध्य प्रदेशच्या विभाजनानंतर अधिनियम २००० च्या अनुसार १ नोव्हेंबर २००० रोजी नव्या छत्तीसगड राज्याची स्थापना केली. यामध्ये रायपूर, बिलासपूर, बस्तर, सरगुजा आणि राजनांदगावसह १६ जिल्ह्यांचा समावेश होता. त्यानुसार २००० पासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार अजीत जोगी यांनी डिसेंबर २००३ पर्यंत मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली. तर २००३, २००८ आणि २०१३ या तिनही विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने विजय मिळवत तब्बल १५ वर्ष सत्तेवर राहण्याचा मान मिळवला. भाजपचे डॉ. रमन सिंह यांनी तिनही वेळेस मुख्यमंत्री पद भुषवले. मात्र आता काँग्रेस पक्षाच्या विजयाची चिन्ह दिसत असून या राज्याला तिसऱ्या मुख्यमंत्र्याचा चेहरा पाहायला मिळणार आहे.

वाचा : Madhya Pradesh Elections 2018 : बसपा किंगमेकर? ७ जागी आघाडीवर

वाचा : Rajasthan Election 2018 : भाजप ७९, काँग्रेस १००

वाचा : Telangana Elections 2018 : तेलंगणात टीआरएस सत्ता बसवणार?

वाचा : Mizroam Election 2018: मिझो फ्रंट पुन्हा आघाडीवर

 

 

First Published on: December 11, 2018 4:41 PM
Exit mobile version