घरदेश-विदेशMadhya Pradesh Elections 2018 : आकडेवारी रंगतदार स्थितीत!

Madhya Pradesh Elections 2018 : आकडेवारी रंगतदार स्थितीत!

Subscribe

रात्री – ११ वाजता – शिवराज सिंह चौहान सरकारला मोठा झटका देत काँग्रेसने मध्य प्रदेशमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. या दोन्ही पक्षांमध्ये मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मोठी चुरस पाहायला मिळाली. रात्री उशीरा वृत्त हाती आले तेव्हा दोन्ही पक्षांमध्ये चांगलीच चुरस रंगली होती.

भारतीय जनता पक्ष – विजयी – ७२, आघाडी – ३७

- Advertisement -

काँग्रेस – विजयी – ७३, आघाडी – ४१

बसपा – विजयी – ०, आघाडी – २

- Advertisement -

सपा – विजयी – ०, आघाडी – १

अपक्ष – विजयी – ३, आघाडी – १


मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजपने सारख्याच अर्थात ४७ जागा जिंकल्या असून अजूनही काँग्रेस ६६ जागांवर तर भाजप ६३ जागांवर आघाडीवर आहे


मध्य प्रदेशमध्ये रंगतदार अवस्था. भाजप ८७ तर काँग्रेस ८८ जागांवर आघाडीवर, भाजप २४ तर काँग्रेस २३ जागांवर विजयी, रात्री १० वाजता निकाल जाहीर होणार


पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आता हळूहळू हाती येऊ लागले असून मध्य प्रदेशमध्ये भाजप ३ जागांवर विजयी झाली असून १०३ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस अजूनही ११५ जागांवर आघाडीवर आहे. त्याशिवाय बसपाला मोठा फटका बसला असून त्यांचे फक्त दोनच उमेदवार आघाडीवर आहेत.


मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक २०१८

एकूण जागा  – २३०
बहुमतसाठी – ११६

काँग्रेस – ११५

भाजप – १०५

बसपा – ४

सपा – २

इतर – ४


मध्यंतरी भाजपने काँग्रेसला मागे टाकले होते. मात्र आता आलेल्या नव्या कलानुसार पुन्हा एकदा काँग्रेस भाजपच्या पुढे निघाली आहे. सध्या दोन्ही पक्षांमध्ये कमी जागाचे अंतर असून दोन्ही पक्षात चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळत आहे.


भाजपने मध्य प्रदेशात आश्चर्यकारक आघाडी घेतली असून ११३ जागी भाजपचे उमेदवार काँग्रेसच्या पुढे आहेत. तर काँग्रेसचे १०८ उमेदवार सध्या मतमोजणीमध्ये आघाडीवर दिसत आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशात भाजप-काँग्रेसमध्ये काँटे टक्कर पाहायला मिळत आहे.


भाजपचे तीनही बालेकिल्ले उखडून टाकण्याकडे काँग्रेसची वाटचाल 


मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सध्या ११८ जागी आघाडीवर असली तरी भाजपही शतकपूर्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. तसेच बसपाने देखील ७ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास बसपा किंगमेकर ठरू शकेल, अशी चिन्ह दिसत आहेत.


मध्य प्रदेश विधानसभा निवडणूकीत शिवराजसिंह चौहान यांना काँग्रेसने चांगलेच आव्हान दिले असून काँग्रेसने सध्या १०२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप ९६ जागी पुढे आहे.


दुपारी १२ नंतर चित्र स्पष्ट होईल. सरकार बनवण्याची संधी मिळाली तर आम्ही ठरवू कोण मुख्यमंत्री बनेल – दिग्विजय सिंह यांची प्रतिक्रिया.


मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक २०१८ च्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेशात २८ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. मध्य प्रदेश विधानसभेच्या २३० जागांसाठी निवडणूक होत आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी ११६ जागांची गरज आहे. मागच्या १५ वर्षांपासून मध्य प्रदेशात भाजपची सत्ता होती. मात्र पुढल्या पाच वर्षासाठी कोण राज्य करणार याचे चित्र आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल..

५ राज्यांचे लाईव्ह अपडेट्स


मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक २०१३

एकूण जागा  – २३०

भाजप – १६५
काँग्रेस – ५८
बसपा – ४
इतर – ३

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -