घरट्रेंडिंगTelangana Results 2018: राज्यात पुन्हा 'टीआरएस'च

Telangana Results 2018: राज्यात पुन्हा ‘टीआरएस’च

Subscribe

तेलंगणा निवडणुक २०१८


टीआरएस – ८८ 
(विजयी पक्ष)

टीडीपी-काँग्रेस – १९

भाजप – १

इतर – ११

 


 तेलंगणामध्ये पुन्हा एकदा ‘टीआरएस’चा गुलाबी झेंडा फडकला आहे. केसीआर यांच्या ‘तेलंगणा राष्ट्र समिती’ने २०१८ च्या विधानसभा निवडणुंकामध्ये बहुमताने विजय प्राप्त केला आहे. ११९ जागांपैकी ८८ जागांवर टीआरएसने आपली मोहोर उमटवली आहे. अन्य ३ राज्यात यश संपादन केलेल्या काँग्रेस पक्षाला तेलंगणामध्ये मात्र ‘TRS’ने मात दिली आहे. दरम्यान, या विजयाबद्दल पक्षाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी TRS पार्टीच्या कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.


TRS celebertion: केक कापून जल्लोष साजरा

पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केसीआर यांच्या उपस्थितीत केक कापून जल्लोष साजरा केला. पक्षाचा रंग गुलाबी असल्याकारणाने खास ९० किलोग्रॅमचा गुलाबी केक यावेळी कापण्यात आला. केकवर पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेल्या चारचाकी गुलाबी गाडीची प्रतिकृतीदेखील होती. राव यांच्याहस्ते हा केक कापला गेला.

- Advertisement -

Telangana result 2018: ओवेसींचा हा सलग पाचवा विजय

तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील आतापर्यंतच्या मतमोजणीनुसार, तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) आघाडीवर आहे. तर हैदराबादमधून एमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी विजयी झाले आहेत. दरम्यान, अकबरुद्दीन ओवेसी यांचा हा सगल पाचवा विजयआहे. ‘चंद्रयानगुट्टा’ या त्यांच्या मतदारसंघातून ओवेसी सलग पाचव्यांदा विजयी झाले आहेत.

 

- Advertisement -


तेलंगणामध्ये सर’कार’ तेजीत; महाआघाडी मागे

टीआरएस‘ला मिळालेल्या विजयावरुन, तेलुगू जनतेने पुन्हा एकदा केसीआर यांना मुख्यमंत्रीच्या रुपात कौल दिला असल्याचं म्हणता येईल. गेल्या निवडणुकांच्या तुलनेत यंदा टीआरएसने मोठा विजय मिळवला आहे. वारंगल, मेदक आणि करीमनगर या जिल्ह्यात टीआरएस प्रामुख्याने आघाडीवर आहे.


तेलंगणा जनतेनं दिलेला कौल खोटा ठरवू शकतं नाही – खासदार के. कविता

ज्या पक्षाची हार होते तो पक्ष मतदान यंत्रांमध्ये घोटाळा असल्याचा आरोप करीत असतो. त्यामुळे काँग्रेसने केलेला आरोप खोटा असून सोमवारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत सांगितले होते की, मतदान यंत्रांमध्ये घोटाळा करणे शक्य नाही. तेलंगणाच्या जनतेने टीआरएसला विश्वासाने जिंकून दिले आहे. त्यामुळे काँग्रेस मतदान यंत्राला खोटे कसे ठरवू शकते असे मत टीआरएसच्या खासदार के. कविता यांनी व्यक्त केले आहे.


तेलंगणा येथे इव्हीएम मशीनमध्ये घोटाळा – काँग्रेसचा आरोप

तेलंगणात टीआरएएस आघाडीवर असल्याने पिछाडीवर पडलेल्या काँग्रेसने मतदान यंत्रांवर संशय घेतला आहे. आम्हाला इव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा संशय आहे, त्यामुळे व्हीव्हीपॅटमधील स्लिप्सची मोजणी करण्यात यावी अशी मागणी तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे सदस्य उत्तम कुमार रेड्डी यांनी केली आहे.


 


टीआरएसने बहुमताचा आकडा गाठला

तेलंगणात टीआरएस आणि एमआयएम युतीने बहुमताचा आकडा पार केला आहे. टीआरएस सध्या ८२ जागांवर आघाडीवर आहे. टीडीपी-काँग्रेस युतीला २५, भाजपा ६ तर इतर ६ जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे तेलंगणात पुन्हा एकदा टीआरएस-एमआयएम सत्तेवर बसणार असल्याची शक्यता दिसून येत आहे.


तेलंगणा टीआरएसला पुन्हा सत्तेत बसवणार- के. कविता

तेलंगणातील जनता आमच्यासोबत असल्याचा आमचा विश्वास आहे. तसेच तेलंगणात आम्ही गांभीर्याने कामे केली आहेत, त्यामुळे इथल्या तेलंगणा जनतेने आम्हाला दिलेल्या संधीचा आम्ही विकासकामांसाठी वापर केला आहे. त्यामुळे तेलंगणाची जनता आम्हाला पुन्हा सत्तेत बसवतील याचा आम्हाला विश्वास आहे, असे मत टीआरएसच्या खासदार के. कविता यांनी व्यक्त केले आहे.


तेलंगणा विधानसभा निवडणूक २०१८ च्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली आहे.  ७ डिसेंर रोजी मतदान झाले होते. तेलंगणात एकूण ११९ जागांसाठी मतदान झाले होते. त्यासाठी २ कोटी ८० लाख ७४ हजार ७२२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. सत्ता स्थापन करण्यासाठी तेलंगणामध्ये ६० जागांची गरज आहे. तेलंगणातील विधानसभेच्या पहिल्याच निवडणुकांमध्ये प्रादेशिक पक्ष असलेल्या टीआरएसने २०१४ साली सत्ता मिळवली होती. २०१४ साली तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच टीआरएसने स्पष्ट बहुमत मिळवले होते. यंदाचा कल कोणाच्या बाजूने असणार हे चित्र सायंकाळ पर्यंत स्पष्ट होईल.


तेलंगणा विधानसभा निवडणूक २०१४

  • तेलगु देसम पक्ष – ९० 
  • भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस – १३ 
  • एमआयएम – ७ 
  • इतर – ९ 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -