अजब! ‘या’करता महिलांनी अनेक नवरे करावेत; शास्त्रज्ञांचा सल्ला

अजब! ‘या’करता महिलांनी अनेक नवरे करावेत; शास्त्रज्ञांचा सल्ला

फोटो प्रातिनिधिक आहे

एकीकडे कोरोना विषाणूने जगभर कहर केला असताना दुसरीकडे एक अजब बाब समोर आली आहे. एका महिलेने अनेक नवरे करावेत, असा सल्ला चक्क शास्त्रज्ञांनी दिला आहे. कोरोनाचे केंद्र असलेल्या चीनमध्ये सध्या एका महिलेने अनेक नवरे करावेत, अशी मागणी होताना दिसत आहे. चिनी अर्थशास्त्रज्ञ यी कांग एनजी यांनी हा सल्ला दिला आहे.

यामुळे करावे अनेक नवरे

चीन देशात सध्या लैंगिक असमानता प्रचंड वाढली आहे. तसेच पुरुषांचा जन्मदर देखील महिलांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे हीच परिस्थिती राहिली तर २०५० पर्यंत चीनमध्ये ३ कोटी पुरुष अविवाहित राहतील अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी काही काळ महिलांना एकाहून अधिक नवरे करण्याचा अधिकार देण्यात यावा, असा सल्ला चिनी अर्थशास्त्रज्ञ यी कांग एनजी यांनी दिला आहे.

पुरुषांच्या वाढत्या संख्येमुळे महिलांची संख्या कमी होईल आणि त्यामुळे अविवाहित पुरुषांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण होईल. तसेच यामध्ये वयाचे बंधन देखील नसेल. त्यामुळे अनेक पुरुषांवर अविवाहित राहण्याची वेळ येईल आणि त्यांच्या मन: स्वास्थावर परिणाम होईल. त्यामुळे महिलांना एकाहून अधिक पुरुषांसोबत लग्न करण्याची मुभा द्यावी. त्याचप्रमाणे वेश्याव्यवसायही कायदेशीर करावा. त्याचप्रमाणे महिलेने एकाहून अधिक लग्न करण्याची प्रथा तिबेटमध्ये आहे.  – यी कांग; फूदान विद्यापीठाचे प्राध्यापक


हेही वाचा – खुशखबर! कोरोनावर औषध निघालं; फक्त ४ दिवसांमध्ये बरा होणार ‘कोरोना’


 

First Published on: June 12, 2020 1:30 PM
Exit mobile version