घरताज्या घडामोडीखुशखबर! कोरोनावर औषध निघालं; फक्त ४ दिवसांमध्ये बरा होणार 'कोरोना'

खुशखबर! कोरोनावर औषध निघालं; फक्त ४ दिवसांमध्ये बरा होणार ‘कोरोना’

Subscribe

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तयार करण्यात आले औषध.

वुहान शहरामधून संपूर्ण जगभरातील विविध देशांमध्ये कोरोना व्हायरसने अक्षरश: कहर केला आहे. या कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्याप यावर लस आले नसल्याचे बोले जात असताना आता एक दिलासादायक बाब समोर आली आहे. या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रशियाकडून अधिकृतरित्या एका औषधाची घोषणा करण्यात आली असून देशातील विविध भागात हे औषध उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

हे आहे औषध

कोरोनावर मात करण्यासाठी अद्याप कोणतीही लस आलेली नाही. मात्र, रशियाकडून कोरोनावरील उपचारासाठी एविफेविर या अॅण्टी व्हायरल औषधाच्या वापरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. देशातील जवळपास सर्व भागात या औषधाचा पुरवठा करण्यासंबंधी करार करण्यात आला असून या औषधाविषयी रशियामधील आरडीएफआय (RDFI) या मंडळाने याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे एविफेविर औषधाचा वापर करणारे काही रुग्ण चार दिवसांमध्ये बरे झाल्याचा दावाही या मंडळाकडून करण्यात आला असल्याची माहिती ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्ताने दिली आहे.

- Advertisement -

१० देशांकडून औषधांची मागणी

दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे अनेक देश हतबल झाले आहेत. लॉकडाऊन आणि इतर काही उपाययोजनांनंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बहुतांश देशांनी हात टेकले आहेत. अशातच रशियात या अ‍ॅण्टी व्हायरल औषधाचा वापर सुरू झाल्यानंतर जगभरातील तब्बल १० देशांनी रशियाकडे या औषधाची मागणी केली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करणाऱ्या लसींचे संशोधन काही देशांमध्ये सुरु आहे. लस विकसित करण्यासाठी आणि बाजारात उपलब्ध करुन देण्यासाठी अनेक कंपन्यांनी कंबर कसली आहे. तर जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन कंपनीने देखील आशेचा किरण दाखवला आहे. विशेष म्हणजे कोरोनाला अटकाव करणारी लस तयार असून पुढील महिन्यात मानवांवर चाचणी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दिलासादायक: भारतात कोरोनाचा समूह संसर्ग नाही


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -