२०१५ पासून चीनची कोरोना विषाणूच्या निर्मितीची तयार सुरू, ‘द वीकेंड ऑस्ट्रेलियन’चा दावा

२०१५ पासून चीनची कोरोना विषाणूच्या निर्मितीची तयार सुरू, ‘द वीकेंड ऑस्ट्रेलियन’चा दावा

२०१५ पासून चीनची कोरोना विषाणूच्या निर्मितीची तयार सुरू, ‘द वीकेंड ऑस्ट्रेलियन’चा दावा

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जगातील १५ कोटींहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून ३३ लाखांहून अधिक जणांचा जीव गेला आहे. कोरोना काळाच्या सुरुवातीपासून हा विषाणू चीनमध्ये उदयास आल्याचा दावा अनेक शास्त्रज्ञ करत आहेत. काही जण म्हणतं आहेत की, चीनमधील वुहान येथील मटण मार्केटमधून कोरोना विषाणू पसरला. तर काही जण म्हणतं आहेत की, चीनच्या प्रयोगशाळेतून पसरला. मात्र असे अनेक दावे चीन फेटाळत आला आहे. पण आता ‘द वीकेंड ऑस्ट्रेलियन’ रिपोर्टमधून खरा कोरोनाचा बाप चीनच असल्याचे समोर आले आहे. तिसरे महायुद्धातील जैविक अस्त्र म्हणून चीनने कोरोना विषाणूचा वापर केल्याचा दावा ‘द वीकेंड ऑस्ट्रेलियन’ रिपोर्टमधून केला आहे.

दरम्यान कोरोना विषाणू संदर्भातील चीनचे दावे स्वीकारण्यास कोणीच तयार नाही आहे. ज्या चीनमधून कोरोना विषाणू उदयास आला तो देश या विषाणूच्या प्रादुर्भावापासून इतका सुरक्षित कसा?, चीन ६ ते ८ महिन्यात पूर्ववत कसा झाला? असे अनेक प्रश्न प्रत्येकाला पडत आहे. कोरोना विषाणू २०२० मध्ये पसरला असला तरी त्याची तयारी २०१५ पासून चीन करत असल्याचा दावा ‘द वीकेंड ऑस्ट्रेलियन’या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. ज्या देशात हा विषाणू सोडला जाईल त्या देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा चीनचा उद्देश होता, असे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

‘द वीकेंड ऑस्ट्रेलियन’च्या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, मागील ५ वर्षांपासून चीनचे शास्त्रज्ञ तिसऱ्या महायुद्धाची तयार करत आहेत. हे महायुद्ध अण्वस्त्रांनी नाहीतर जैविक शस्त्रांनी लढले गेले पाहिजे. कारण तिसरे महायुद्ध जर जिंकायचे असेल तर हे शस्त्र यशस्वी ठरतील असा दावा चीनच्या शास्त्रांनी केला होता. त्यामुळे विषाणू विकसित झाला की, तो ढगाळ वातावरणात किंवा पावसाळ्यात सोडण्याचा कट चीनने रचला. पीपल लिबरेशनच्या अधिकाऱ्यांना कोरोना विषाणू कधी, कसा सोडायचा, याचा अभ्यास केला होता.

सध्या चीनमधील परिस्थिती काय?

जगात आतापर्यंत १५ कोटी ८९ लाख ६९ हजार २२७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ३३ लाख ६ हजार ७२३ जणांचा मृत्यू झाला असून १३ कोटी ६५ लाख १६ हजार ७८३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर चीनमध्ये आतापर्यंत ९० हजार ७६९ कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी ४ हजार ६३६ जणांचा मृत्यू झाला असून ८५ हजार ८३५ जण कोरोनामुक्त झाले आहे. जागतिक क्रमवारीत जे चीन कोरोना महासंकटाच्या सुरुवातील पहिल्या स्थानावर होते, ते आता ९६व्या स्थानी आहे.


हेही वाचा – म्युकॉरमायकोसिस बुरशीची लक्षण आणि परिणाम काय ? ICMR ने सुचविले Do’s & Don’t


 

First Published on: May 10, 2021 10:42 AM
Exit mobile version