आईच्या औषधासाठी, शाळेच्या फीसाठी ‘तो’ उचलतो कोरोना रुग्णांचे मृतदेह

आईच्या औषधासाठी, शाळेच्या फीसाठी ‘तो’ उचलतो कोरोना रुग्णांचे मृतदेह

आईच्या औषधासाठी, शाळेच्या फीसाठी 'तो' उचलतो कोरोना रुग्णांचे मृतदेह

कोरोना लॉकडाऊन होण्यापूर्वी बारावीचा विद्यार्थी चांद मोहम्मदच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत चालू होत आणि त्याला डॉक्टर बनण्याची इच्छा होती. पण लॉकडाऊनमध्ये त्याच्या कुटुंबावर बिकट परिस्थिती ओढावली. त्याच्या मोठ्या भावाची लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली. त्यामुळे आईच्या औषधोपचारसाठी आणि भावंडांच्या शाळेची फी भरण्यासाठी तो एलएनजेपी हॉस्पिटमध्ये कोरोना रुग्णांचे मृतदेह उचलत आहे. चांदच्या आईला थायरॉईडचा आजार आहे पण कुटुंबाकडे उपचाराकरिता पैसे नाहीत.

सीलमपूर येथे राहणार चांद मोहम्मद अवघ्या २० वर्षांचा आहे. त्याचा मोठा पूर्वी कृष्णा नगर बाजारात दुकानात काम करून घर चालवत होता. त्याची नोकरी गेल्यानंतर शेजाऱ्यांकडील मिळणार रेशन आणि छोटी-मोठी नोकरीवर कुटुंब चालत होते. अशा परिस्थितीत त्याला एलएनजेपी रुग्णालयात साफसफाईचे काम मिळाले. त्यामुळे तो दुपारी १२ वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत कोरोना रुग्णांचे मृतदेह उचलत असतो.

याबाबत तो म्हणाला की, ‘जेव्हा काम मिळाले नाही तेव्हा हे काम केले. या कामामुळे कोरोनाचे संसर्ग होण्याचा जास्त धोका आहे. पण नोकरीची देखील तितकीच गरज आहे. कुटुंबात तीन बहिणी, दोन भाऊ आणि आई-वडील आहेत. यावेळेस आम्हाला अन्न आणि आईच्या औषधांची आवश्यकता आहे. लॉकडाऊन दरम्यान काही दिवस आम्ही एक वेळेच जेवण जेवत होतो. आपण कदाचित कोरोनाच्या संसर्गपासून वाचू शकतो पण उपासमारीने वाचू शकत नाही. त्यामुळे त्याने कर्जासाठी बऱ्याच लोकांची भेट घेतली पण कोणीही कर्ज देण्यास तयार नव्हते.’

चांदने पुढे सांगितले की, त्याच्या तीनही बहिणी शाळेत शिकत आहे. तो स्वतः बारावीत आहे आणि त्याला शाळेची फी भरणे शक्य झालेले नाही. अभ्यासासाठी पैशांची गरज आहे. त्याच्या पहिल्या पगारामुळे कुटुंबाची परिस्थिती सुधारेल अशी त्याला आशा आहे. कामावर जाण्यापूर्वी तो नमाज पठण करतो आणि त्याला देवावर विश्वास आहे. तोच रक्षण करील आणि मार्ग दाखवेल. अशा धोकादायक काम करणाऱ्याला कोणतीही विमा पॉलिसी नाही आहे, याची त्याला चिंता आहे. या धोकादायक कामासाठी त्याला १७ हजार रुपये मिळतात.

तो नेहमी इतर कर्मचाऱ्यांसह दोन किंवा तीन मृतदेह उचलतो. मग मृतदेहांना रुग्णवाहिकेत ठेवतो आणि स्मशानभूमीत घेऊन जातो. हे सर्व काम त्याला पीपीई कीट घालून करावे लागते. ज्यामुळे चालण्यास आणि श्वास घेण्याच त्रास होतो. पीपीई कीटमुळे त्यांची घामाने आंघोळ होते, असे चांद सांगितले.


हेही वाचा – आता कपडे करणार PPE किटचं काम! कोरोना नष्ट करण्यास IIT-ISM कडून विशेष कोटिंगची निर्मिती


 

First Published on: June 18, 2020 8:54 AM
Exit mobile version