घरदेश-विदेशआता कपडे करणार PPE किटचं काम! कोरोना नष्ट करण्यास IIT-ISM कडून विशेष...

आता कपडे करणार PPE किटचं काम! कोरोना नष्ट करण्यास IIT-ISM कडून विशेष कोटिंगची निर्मिती

Subscribe

कोरोनाचे विषाणू प्लास्टिक, धातू किंवा इतर कोणत्याही वस्तूंवर जीवंत राहतो. अशात ही कोटिंग कोरोनापासून बचावासाठी फायदेशीर ठरणार

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पीपीई किट जास्तीत जास्त उपलब्ध करून देणं शक्य नसल्याने सध्य परिस्थिती लक्षात घेता, आयआयटी आयएसएमने स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करत कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी पॉलिमेरिक सुपर हायड्रोफोबिक कोटिंग तयार केले आहे. या कोटिंगच्या संपर्कात जीवघेणा कोरोना व्हायरस आल्यास त्याचा नाश होतो. नॅनोटक्नोलॉजीवर आधारीत आयआयटी आयएमएमचं हे तंत्रज्ञान कोरोनासह भविष्यातील इतर सर्व व्हायरस नष्ट करू शकतो असा दावा देखील करण्यात येत आहे.

- Advertisement -

कोटिंगचे पेटंट तयार करण्याचे काम सुरु

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी अनेक चाचण्या करण्यात आल्यात. या चाचण्यानंतर या कोटिंगला तयार करण्यात आल्याचे सुपर हायड्रोफोबिक कोटिंग तयार करणारे आयएसएमचे रसायय विभागाचे प्रो. आदित्य कुमार यांनी सांगितले आहे. तसेच, कोरोनाचे विषाणू प्लास्टिक, धातू किंवा इतर कोणत्याही वस्तूंवर जीवंत राहतो. अशात ही कोटिंग कोरोनापासून बचावासाठी फायदेशीर असून या सुपर हायड्रोफोबिक कोटिंगचे पेटंट तयार करण्याचे काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

मोदींनी ‘मन की बात’मधून केले कौतुक

या नव्या तंत्रज्ञानाची आणि IIT-ISM कडून करण्यात आलेल्या नव्या शोधाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मन की बात कार्यक्रमातून देखील कौतुक केले आहे. मन की बातच्या ट्विटर हँडलवरुनही याची अपडेट देण्यात आली आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करुन आयएसएमच्या शास्त्रज्ञांनी नॅनो टेक्नॉलॉजीच्या मदतीने पॉलिमेरिक सुपर हायड्रोफोबिक कोटिंग तयार केल्याचे सांगितले जात आहे, दरम्यान यामध्ये कोरोना व्हायरसही नष्ट करण्याची क्षमता देखील आहे.


सैनिकांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही; जशास तसं उत्तर देण्यास आम्ही सक्षम – पंतप्रधान

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -