CoronaVirus: पुन्हा एकदा WHOने भारताचं केलं कौतुक!

CoronaVirus: पुन्हा एकदा WHOने भारताचं केलं कौतुक!

CoronaVirus: पुन्हा एकदा WHOने भारताचं केलं कौतुक!

जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वीमनाथन यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण ठेवल्यामुळे भारताचं कौतुक केलं आहे. तसंच त्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा काही एक महिने आणि वर्ष शक्यतो राहिल अशी भीती व्यक्त केली आहे. तसेच कोविड-१९वरची लस करण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावले अशी अपेक्षा त्यांनी व्यक्ती केली आहे.

सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, कोरोना विषाणूपासून वर्षानुवर्षे मुक्तात मिळणार नाही. संपूर्ण दुनियेला येत्या महिन्यांपर्यंत किंवा वर्षांपर्यंत संसर्गाच्या प्रसारासाठी तयार राहावे लागेल. केवळ औषध विकसित करणे आणि त्याची चाचणी करणे पुरेसे नाही.

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्तान आयोजित केलेल्या परिषदेत स्वामीनाथन पुढे म्हणाल्या की, आतापर्यंत भारतामध्ये कोविड-१९ महामारीवर केलेले नियंत्रण आणि इतर देशांच्या तुलनेत कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यात मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे त्यांनी भारताचं अभिनंदन केलं. यापूर्वी देखील जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक मायकल जे रेयान यांनी भारतांच कौतुक केलं होत.

जागतिक आरोग्यच्या म्हणण्यानुसार, सोमवारपर्यंत कोविड-१९चे ३९ लाख ७६ हजार ०४३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २ लाख ७७ हजार ७०८ कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात आतपर्यंत कोविड-१९चे २ हजार २०० जणांचे कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसंच ६७ हजारहून अधिक रुग्ण कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे.


हेही वाचा – म्हणून २००८ साली धोनीने कर्णधार पद सोडण्याची दिली होती धमकी!


 

First Published on: May 11, 2020 9:14 PM
Exit mobile version