घरक्रीडाम्हणून २००८ साली धोनीने कर्णधार पद सोडण्याची दिली होती धमकी!

म्हणून २००८ साली धोनीने कर्णधार पद सोडण्याची दिली होती धमकी!

Subscribe

भारतीय संघाचे अनेक कर्णधार झाले मात्र महेंद्र सिंग धोनीने आपला एक वेगळाच ठसा उमटवला आहे. २००७मध्ये निवडकर्त्यांनी धोनीवर विश्वास ठेऊन वर्ल्ड कप टी-२० साठी कर्णधार पदाची जबाबदारी दिली. २००८ मध्ये निवड समितीने एक मिटिंगमध्ये घेतलेला निर्णय लीक झाला होता.

याच पार्श्वभूमीवर बोलताना आर. पी सिंग यांने काही महिती दिली. त्यावेळेस दिलेल्या वृत्तानुसार, धोनी २००८मध्ये निवड समितीच्या निर्णयाच्या विरोधात होता. ज्यामध्ये आर पी सिंगच्या जागी इरफान पठाणला घेतलं जाणार होते. यासाठी धोनीनी कर्णधार पद सोडण्याची धमकी दिली होती. यानंतर धोनीने पुढच्या दोन मॅचमध्ये आर पी सिंगला प्लेईंग इलेव्हमध्ये संधी दिली होती. याचीच आठवण काढत आर. पी सिंग म्हणाला की, जेव्हा खेळाडूंच्या निवडीचा विषय असायचा तेव्हा धोनी आपल्या टीमसाठी निष्पक्षपणे निर्णय घ्यायचा. २००८मधील ही बातमी लीक झाल्यानंतर धोनीवर कुठलाही परिणाम झाला नाही. तसंच याचा परिणाम माझ्यावर देखील झाला नाही.’

- Advertisement -

इंग्लंड सिरिजबाबत बोलताना आर.पी.सिंग म्हणाला की, इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात मला विकेट मिळाली नव्हती. खेळाडूला दोन किंवा तीन संधी मिळायला हव्यात आणि हे गरजेचं आहे. पण हे नेहमीच होईल असं नाही. काही लोकांना पाच संधी मिळतात तर काही १० संधी मिळतात.

आर.पी. सिंग धोनीचा चांगला मित्र आहे. तरीदेखील तो धोनीला आपण कुठे सुधारणा केली पाहिजे याबाबत विचारायचा, असे याची देखील आर.पी.सिंग म्हणाला.

- Advertisement -

हेही वाचा – हिंदी महासागराच्या वरती तुडले रशियाचे रॉकेट, तुकड्यांचा सॅटेलाईट्सना धोका!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -