प्रियांका गांधींना सरकारी बंगला रिकामा करण्याचे आदेश

प्रियांका गांधींना सरकारी बंगला रिकामा करण्याचे आदेश

प्रियांका गांधी (फाईल फोटो)

प्रियांका गांधींना सरकारी बंगला सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका महिन्यात सरकारी बंगला रिकामा करण्यासाठी सरकारने कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांना निर्देश जारी केले आहेत. गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाने वरील आदेश जारी केले आहेत. प्रियांका गांधी लोधी इस्टेट, ३५ या बंगल्यात अनेक वर्षांपासून राहत होत्या. एसपीजी सुरक्षा हटवल्यामुळे बंगला रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रियांका गांधींना १ ऑगस्ट पर्यंत बंगला रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एसपीजी सुरक्षा असल्यामुळे प्रियांका गांधींना बंगला देण्यात आला होता. २०१९ मध्येच संपूर्ण गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा काढण्यात आली आहे. यामुळे आता १९९७ रोजी दिलेला बंगला रिकामा करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.


हेही वाचा – ‘भ्रमित ठाकरे’ सरकार जनतेला संभ्रमात टाकतंय – चंद्रकांत पाटील


First Published on: July 1, 2020 8:01 PM
Exit mobile version