घरमहाराष्ट्र'भ्रमित ठाकरे' सरकार जनतेला संभ्रमात टाकतंय - चंद्रकांत पाटील

‘भ्रमित ठाकरे’ सरकार जनतेला संभ्रमात टाकतंय – चंद्रकांत पाटील

Subscribe

महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक?; चंद्रकांत पाटलांचा सरकारला सवाल

राज्यातील लॉकडाऊच्या नियमावलीवरुन भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक? असा सवाल त्यांनी राज्यातील सरकारला केला आहे. ‘भ्रमित ठाकरे’ सरकार जनतेला संभ्रमात टाकतंय, असं ट्विट करत त्यांनी सरकारला टोला लगावला आहे. अर्थचक्र फिरवायचं का दोन किमी मध्येच फिरायचं, काय ते ठरवा असंही त्यांनी म्हटलं आहे. तातडीने निर्णय घेऊन जनतेचा संभ्रम दूर करा, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला आहे.

“महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक? अर्थचक्र फिरले पाहिजे, पुनश्च हरी ओम झाले पाहिजे म्हणणारे हे “भ्रमित ठाकरे” सरकार जनतेला फक्त दोन किमी पर्यंत वाहतुकीला परवानगी देण्याच्या जुलमी निर्णयाने अधिकच संभ्रमात टाकत आहे. काय ते एकदा ठरवा अर्थचक्र फिरवायचे का दोन किमी मध्येच फिरायचे, तातडीने निर्णय घ्या जनतेचा संभ्रम दूर करा,” असं ट्विट करत चंद्रकांत पाटलांनी सरकारला प्रश्न विचारले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – चीनला धक्का; BSNL-MTNL ने 4G निविदांसंदर्भात घेतला मोठा निर्णय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -