बंगाल- काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून महाराष्ट्राचे नेते गायब

पश्चिम बंगालमध्ये २७ मार्चला विधानसभा निवडणुकीच्या पहील्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपने ही निवडणुक प्रतिष्ठेची केली असून याच मुद्द्यावरून तृणमूलही जोरदार प्रचार करत आहे. याचपार्श्वभूमीवर भाजपाने नुकतीच आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यानंतर लगोलग काँग्रेसनेही आपल्या ३० स्टार प्रचारकांच्या नावाची यादी जाहीर केली. पण यात महाराष्ट्रातील एकाही नेत्याचे नाव नाही. यामुळे राजकीय गोटात आश्चर्ये व्यक्त केले जात आहे.

काँग्रेसच्या यादीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह दिग्गज नेत्यांची नावे आहेत. यात मल्लिकार्जुन खर्गे, नवज्येत सिंग सिद्धू, कमलनाथ, भूपेश बघेल, कॅप्टन अमरिंदर सिंग,अशोक गेहलोत, सचिन पायलट, असे दिग्गज आहेत. पण महाराष्ट्रातील एकाही नेत्याचा यात समावेश नाही.

तर भाजपच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, अभिनेते मिथुन चक्रवर्ती, जुअल ओराम, नितीन गडकरी, पायल सरकार, स्मृती इराणी ,यश दासगुप्ता, श्रबंती चटर्जी, हिरेन चटर्जी, केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा,अशा ४० दिग्गजांचा समावेश आहे. यामुळे भाजप आणि काँग्रेससाठी ही निवडणूक अटीतटीची असणार आहे.

 

First Published on: March 12, 2021 6:44 PM
Exit mobile version