…येथे बलात्कारासारख्या घटना घडत असतात, बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझींचे वादग्रस्त विधान

…येथे बलात्कारासारख्या घटना घडत असतात, बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझींचे वादग्रस्त विधान

वैशाली – बिहारचे माजी मुख्यमंत्री हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे (एचएएम) अध्यक्ष जीतनराम माझी यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. बिहार मोठे राज्य आहे. बलात्कारासारख्या घटना होत असतात, असे विधान त्यांनी केले आहे. दोन दिवसांपूर्वी वैशाली जिल्ह्यातील जांदा येथे सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. आरोपींनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला होता. यानंतर परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले आहे.

जीतनराम काय म्हणाले –

या घटनेबाबत पोलिसांनी कारवाई केली आहे. लवकरच आरोपी पकडले जातील. नितीश कुमार सरकारला बदनाम करण्याचा हा विरोधकांचा डाव असू शकतो, असे जीतनराम माझी म्हणाले. विरोधकांच्या आरोपावर जीतनराम मांझींना प्रश्न विचारला असता, काहीही बोलता येते. बिहारमध्ये एक-दोन कोटी लोक राहत नाहीत. बिहारची लोकसंख्या 12 कोटी आहे. येथे बलात्कारासारख्या घटना घडत असतात. अशा परिस्थितीत सरकारने या घटनेवर काय कारवाई केली, हे पाहावे लागेल. सरकारने आरोपींना पकडण्यासाठी तत्काळ कारवाई करून त्यांच्यावर छापे टाकल्याचे तुम्ही पाहिले असेल. विरोधकांचा सरकारला बदनाम करण्याचा हा डाव असू शकतो, असे ते म्हणाले.

भाजपची टीका –

वैशालीमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर भाजपकडून नितीश कुमार सरकारवर टीका करण्यात येत आहे. भाजपने सरकारला जंगलराज आमि गुंडाराज म्हटले आहे.

यापूर्वीही केले वादग्रस्त वक्तव्य –

जीतनराम मांझी यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही ते आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. मी भगवान रामाला मानत नाही, असे ते म्हणाले होते. स्वतःला माता शबरीचे वंशज असल्याचे सांगून त्यांनी भगवान रामाचे वर्णन एक काल्पनिक पात्र असल्याचे सांगितले होते. तसेच, मी वाल्मिकींवर विश्वास ठेवतो, तुलसीदासांवर नाही, असेही ते म्हणाले होते.

First Published on: September 14, 2022 2:36 PM
Exit mobile version