दिल्लीत कोरोनाचा कहर; प्रत्येक तासाला ४ जणांचा बळी!

दिल्लीत कोरोनाचा कहर; प्रत्येक तासाला ४ जणांचा बळी!

देशाची राजधानी दिल्लीत कोरोना विषाणूचा कहर झपाट्याने वाढत आहे. नोव्हेंबरमध्ये प्रत्येक तासाला चार जणांचा मृत्यू होत आहे. एकट्या रविवारी दिल्लीत ९५ जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसांत मृत्यूचा हा तिसरा मोठा आकडा आहे. आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यात दिल्लीत कोरोनामुळे १ हजार १०३ लोकं मृत्यूमुखी पडले आहेत.

गेल्या १५ दिवसांत दिल्लीमध्ये दररोज ७३.५ टक्के जणांचा मृत्यू होत आहेत. म्हणजे प्रत्येक तासाला तीन लोकं जीव गमावत आहेत. गेल्या काही दिवसांत मृत्यूचा आकडा वाढून दिवसाला ९० जणांचा मृत्यू होत आहे. गेल्या गुरुवारी दिल्लीमध्ये सर्वाधिक १०४ जणांचा मृत्यू झाला होता. तर शनिवारी ९६ जणांचा कोरोना मृत्यू झाल्याची नोंद झाली होती.

आतापर्यंत दिल्लीत ७ हजार ६१४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील राजधानीत सध्याच्या मृत्यूदर १.५ टक्के आहे. दिल्लीत कोरोनाचे पहिले प्रकरण २ मार्चला समोर आले होते. त्यानंतर एप्रिलमध्ये कोरोनामुळे दररोज दोन जणांनी आपला प्राण गमावला. मेमध्ये ४१४ जणांचा मृत्यू झाला होता, म्हणजेच दररोज १३.३ लोकांचा मृत्यू होत होत होता. मग जूनमध्ये कोरोनाचा मृत्यूचा आकडा झपाट्याने वाढला. जूनमध्ये २ हजार २६९ जणांचा मृत्यू झाला. म्हणजे दररोज ७५.६ टक्के जणांचा मृत्यू होत होता. मग जुलैमध्ये मृत्यूचा आकडा ३९.३ प्रति दिन आणि ऑगस्टमध्ये १५५ प्रति दिन झाला होता.


हेही वाचा –  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आयसीयूत


 

First Published on: November 16, 2020 12:00 PM
Exit mobile version