Corona In India: चिंताजनक! देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ; २४ तासांत २,८२,९७० नव्या रुग्णांची नोंद

Corona In India: चिंताजनक! देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ; २४ तासांत २,८२,९७० नव्या रुग्णांची नोंद

Mumbai Corona Update : कोरोना महामारीत मुंबईत आज पहिल्यांदा ५० पेक्षा कमी रुग्ण तर एकाचा मृत्यू

देशात काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत होती. त्यामुळे दिलासाचे वातावरण पसरले होते. मात्र आज देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत काल, मंगळवारच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. काल, मंगळवारी देशात २ लाख ३८ हजार १८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. मात्र आज यामध्ये ४४ हजारांनी वाढ होऊन २ लाख ८२ हजार ९७० नव्या कोरोनाबाधितांची नोंद २४ तासांत झाली आहे. देशातील दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट आता १५.१३ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात गेल्या २४ तासांत ४४१ जणांचा मृत्यू झाला असून १ लाख ८८ हजार १५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. सध्या देशात १८ लाख ३१ हजार सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या आहे.

देशात एकाबाजूला कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे, त्याप्रमाणे ओमिक्रॉनची रुग्ण संख्या वाढत आहे. कालच्या तुलनेत आज ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत ०.७९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात आतापर्यंत ८ हजार ९६१ ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या – ३ कोटी ७९ लाख १ हजार २४१
देशातील एकूण मृत्यूची संख्या – ४ लाख ८७ हजार २०२
देशातील एकूण रुग्ण बरे झालेल्यांची संख्या – ३ कोटी ५५ लाख ८३ हजार ३९
देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या – १८ लाख ३१ हजार
देशातील एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या – ८ हजार ९६१
देशातील एकूण चाचण्याची संख्या – ७० कोटी ७४ लाख २१ हजार ६५०
देशातील एकूण लसीकरणाची संख्या – १ अब्ज ५८ कोटी ८८ लाख ४७ हजार ५५४


हेही वाचा – कोरोनाचे नवे व्हेरिएंट येतच राहणार ! ‘यूएन’ प्रमुखांचा इशारा


 

First Published on: January 19, 2022 9:45 AM
Exit mobile version