Live Update : केंद्र सरकारची मराठा आरक्षणासंदर्भातील याचिका न्यायालयाने फेटाळली

Live Update : केंद्र सरकारची मराठा आरक्षणासंदर्भातील याचिका न्यायालयाने फेटाळली

Live update Mumbai Maharashtra

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात १०२ व्या घटनादुरुस्तीसंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. (सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा)
मुंबईत मागील २४ तासात ६६१ कोरोनाबाधितांची नोंद १ जुलै, संध्या. ६:०० वाजता २४ तासात बाधित रुग्ण – ६६१ २४ तासात बरे झालेले रुग्ण – ४८९ बरे झालेले एकूण रुग्ण – ६९६५९४ बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९६% एकूण सक्रिय रुग्ण- ८४९८ दुप्पटीचा दर- ७३३ दिवस कोविड वाढीचा दर ( २४ जून ते ३० जून)- ०.०९ % (सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा)
राज्यात मागील २४ तासात ९,१९५ कोरोनाबाधितांची नोंद (सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा)
गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुकाणू समिती गठीत केली आहे. गडकिल्ल्याच्या परिसरात पर्यटनासाठी सुविधा निर्माण करणे, परिसराचे जैवविविधता जतन आणि वनीकरण करणे तसेच या कामांचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी शासन निर्णयाद्वारे या सुकाणू समिती नेमण्यात आली आहे. (सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा)
महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष टिकणार, मला मुख्यमंत्री व्हावं वाटत नाही – अजित पवार चंद्रकांत पाटील वैफल्यग्रस्त (सिवस्त बातमीसाठी इथे क्लिक करा)
डॉक्टर हे देवाचे दुसरे रुप आहे, सरकाराने देशातील आरोग्य व्यवस्था सुधारली आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी
गोपीचंद पडळकरांसह १० ते १५ जणांविरोधात गुन्हा दाखल, आपत्ती व्यवस्थापनातंर्गत संचारबंदी कायद्याचे उल्ल्ंघन केल्याने गुन्हा दाखल
समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव रुग्णालयात दाखल
विधानसभा कामकाजासंदर्भात आज महाविकास आघाडी सरकारची महत्त्वपूर्ण बैठक, या बैठकीत तिन्ही पक्षातील मंत्र्यांसह कामकाजासंदर्भात चर्चा केली जाणार आहे.
पडळकरांच्या गाडीवरील दगडफेक प्रकरणी अमित सुरवसेविरोधात गुन्हा दाखल, जोडभावी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल
शेतकरी राजा महाराष्ट्राचे वैभव आहे, दुष्काळा पुरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांच्या अडचणींची मला जाणीव, अन्नदाता, जीवनदाता दोघेही देवचं, शेतकऱ्यांना हमी भाव नाही तर हमखास भाव मिळावा, केंद्रात काय सुरु आहेत ते असू दे पण माझ्य़ा राज्यात शेतकऱ्यांच्या हिताला धक्का पोहोचू देणार नाही-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणी, अटक करण्यात आलेल्या आरोपी संजीव पालांडे आणि कुंदन शिंदेंच्या कोठडीत ६ जुलैपर्यंत वाढ
भारतात स्पुतनिक-V लसीच्या तिसऱ्या फेजच्या चाचणीला नकार
फडणवीसांच्या वेळीही अनेक मंत्र्यावर आरोप झाले, फडणवीसांनी त्या मंत्र्यांना क्लीन चीट दिली. केंद्राकडून ईडी आणि सीबीआयचा गैरवापर, यंत्रणांद्वारे त्रास देणे चुकीचे, दुरुपयोग करुन यंत्रणांना बोथड करुन नका- नाना पटोले
अॅट्रोसिटी करणाऱ्यांविरोधात रॉबरीचे गुन्हे नोंदवा, गुंडांना, बदमाशांना जात धर्म नसतो – संजय गायकवाड, संजय गायकवाडांचा व्हिडिओ व्हायरल
कृषी कायद्यांवर काही घटकांच्या तक्रारी आहेत. कायद्यात दुरुस्ती करणे गरजेचं, कृषी क्षेत्राला संशोधनाची गरज, ५६ टक्के लोक शेतीवर अवलंबून, शेती सुधारली तर अर्थकारण सुधारेल,- शरद पवार  डॉ. डी.वाय. पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शदर पवारांच्या हस्ते उद्धाटन
संत एकनाथ महाराज पालखी सोहळा, संत एकनाथ महाराज्यांच्या पालखीचे आज प्रस्थान, टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी पालखी सोहळ्याचा आनंद घेत आहेत.
दुसरी लाट अजून संपलेली नाही, केंद्राकडून जेवढ्या लस  उपलब्ध होतील तेवढ्या नागरिकांना दिल्या जातील, दक्षता घेऊन पुढे काम करावे लागेल, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
बंड्या तात्या करडाकरांची तात्काळ सुटका करा, संभाजी भिडेंची मागणी
देशात नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज पुन्हा वाढली आहे. देशात आज ४८,७८६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज ६१,५८८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर १००५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.
तपास यंत्रणांचा मविआ सरकारवर परिमाण होणार नाही , मविआबाबत कोणलाही मार्ग बदलता येणार नाही, मविआ सरकार आव्हानांना समोरे जाईल, विरोधकांच्या खोट्या आरोपांचा मुकाबला करु, ठाकरे- पवार यांच्यात नाराजी नाही- संजय राऊत
नाशिकमधून अजित पवार लाईव्ह, राज्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, अधिवेशनात शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे आणू, शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांवर कारवाई करु, नाशिकमधून अजित पवार लाईव्ह
लसीकरण केंद्रांवर जावून लोकांच्या अडचणी जाणून घ्या, सर्व योजना तळागळातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करा, पंतप्रधानांच्या मंत्र्यांना सुचना
रेती आणि जमीन घोटाळा केल्याचा आरोपाखाली मंत्री नितीन राऊत यांची ईडीकडे तक्रार, वकील परमार यांनी केली होती तक्रार
राष्ट्रवादीचा खरा चेहरा उघड होतोयं, माझा आवाज बंद होणार नाही, गोळी घातली तरी लढत राहणार, मी विचारांची लढाई लढतोयं. मी चुकीच्या गोष्टींवर बोलत राहणार, राष्ट्रवादी मुद्यावर नाही तर गुद्द्यावर आली आहे- गोपीचंद पडळकर
आषाढी वारी संदर्भातील भिडेंच्या वक्तव्यासंदर्भात कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करा, अशी मागणी रिपाईचे सचिन खरात यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कारवाई करण्याचीही खरात यांची मागणी
 
First Published on: July 1, 2021 9:55 AM
Exit mobile version