Corona In India: महाराष्ट्रासह चार राज्यांनी देशाची वाढवली चिंता; या राज्यांमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट

Corona In India: महाराष्ट्रासह चार राज्यांनी देशाची वाढवली चिंता; या राज्यांमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट

Corona In India: महाराष्ट्रासह चार राज्यांनी देशाची वाढवली चिंता; या राज्यांमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट

देशात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत कुठेतरी घट दिसत होती. पण आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. आज देशात १ लाख ९४ हजार ७२० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. सध्या देशात सर्वाधिक दिल्ली, महाराष्ट्र यांसारख्या राज्यांमध्ये कोरोनाबाधित झपाट्याने वाढत आहे. देशात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी दर महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्यामुळे या राज्यातील सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेटमुळे देशाची चिंता वाढली आहे.

दर आठवड्याप्रमाणे याही आठवड्यात आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्हिटी रेटची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात २२.३९ टक्के, पश्चिम बंगालमध्ये ३२.१८ टक्के, दिल्लीत २३.१ टक्के आणि उत्तर प्रदेशमध्ये ४.४७ टक्के कोरोना पॉझिटिव्हिटी रेटची नोंद झाली आहे.

जरी या चार राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट जास्त होत असले तरी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरातमध्ये कोरोना प्रकरणात सर्वाधिक वाढ होत आहे.

देशात गेल्या २४ तासात १ लाख ९४ हजार ७२० नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ४४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मंगळवारच्या तुलनेत आज रुग्णसंख्या वाढण्याबरोबरच मृतांचा आकडाही वाढला आहे. मंगळवारच्या तुलनेत ही रुग्णवाढ १५.९ टक्के जास्त आहे. यामुळे देशातील कोरोनाचा संसर्ग दर ११.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर देशातील ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या ४ हजार ८६८वर पोहोचली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये आहे.


हेही वाचा – Corona Virus : कोरोना उपचारावरील मोलनुपिरावीर औषध संततीसाठी धोकादायक, आयसीएमआरचा दावा


 

First Published on: January 12, 2022 5:17 PM
Exit mobile version