Corona Virus : कोरोना उपचारावरील मोलनुपिरावीर औषध संततीसाठी धोकादायक, आयसीएमआरचा दावा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोलनुपिरावीर औषध सर्दी खोकल्यावर उपचार करण्यासाठी बनवले होते. औषध १८ वर्षांवरील नागरिकांना देण्याची परवानगी आहे.

Monlupiravir
Corona Virus : कोरोना उपचारावरील मोलनुपिरावीर औषध संततीसाठी धोकादायक, आयसीएमआरचा दावा

कोरोनावर उपचार करण्यासाठी मोलनुपिरावीर या औषधाला मान्यता मिळाली आहे. परंतु हे औषध होणाऱ्या संततीसाठी धोकादायक असल्याचा दावा आयसीएमआरने केला आहे. ICMR च्या तज्ञांनी सुरक्षेच्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच यामुळे औषधांच्या यादीतून वगळण्यात येत आहे. हे औषध फायद्याचे असले तरी ते महिलांना देण्यात येऊ नये असा सल्ला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) टास्क फोर्सने दिला आहे.

देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. कोरोनाबाधितांना उपचारादरम्यान मोलनुपिरावीर देत असल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या औषधामुळे आयसीयूमध्ये रुग्ण भरती करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु या औषधामुळे संततीवर परिणाम होत आहे. अनुवंशिक भिन्नता संबंधित समस्या उद्भवू शकतात असे मत आयसीएमआर प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी व्यक्त केलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोलनुपिरावीर औषध सर्दी खोकल्यावर उपचार करण्यासाठी बनवले होते. औषध १८ वर्षांवरील नागरिकांना देण्याची परवानगी आहे. तसेच महिलांवर उपचार करण्यासाठी हे औषध फायदेशीर नाही असे आयसीएमआरकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात आयसीएमआरची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये डॉ. बलराम भार्गव यांनी या औषधाला विरोध दर्शवला होता. तर आता डॉ. अरोरा यांनी है औषध १८ ते ६० या वयोगटातील पुरुष आणि महिलांना देऊ नये असा सल्ला दिला आहे. कारण हे औषध थेट महिलांच्या संतती धारणेवर परिणाम करु शकते. त्यामुळे गर्भवती महिलांना हे औषध देऊ नये केवळ ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना देण्यात येऊ शकते. यामुळे केंद्र सरकारकडून या औषधाला परवानगी देण्यात आली आहे. परंतु या औषधाचा वापर अल्प प्रमाणात करण्यात येण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : Corona: कोरोनाबाधिताच्या संपर्कात असूनही का होत नाही कोरोनाची लागण?; नव्या संशोधनातून आले समोर