Live Update: जळगावात ११ मार्चपासून १५ मार्चपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर

Live Update: जळगावात ११ मार्चपासून १५ मार्चपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर

जळगाव जिल्ह्यासह शहरात कोरोनाच्या रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शुक्रवार, शनिवार व रविवार असा 3 दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. त्यामुळे येत्या ११ मार्चपासून ते १५ मार्च सकाळपर्यंत जळगावात जनता कर्फ्यू असणार आहे.


बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक, लेखक, निर्माता संजय लीला भन्साळीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.


भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी कोरोना लसीचा पहिला डोस दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला.


बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, याबाबत त्याची आई नीतू कपूर यांनी माहिती दिली आहे.


देशभरात मोठ्या पातळी कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू आहे. आतापर्यंत २.३ कोटींची कोरोना चाचण्या झाल्या आहेत. काल २० लाख लोकांनी कोरोना लस घेतील, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.


नागपूर मनपाकडे दोन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा राहिला आहे. त्यामुळे लसीच्या तुटवड्याची शक्यता निर्माण झाली आहे.


ठाण्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के असले तरी, येथे कोरोना संसर्गावर म्हणावे तेवढे नियंत्रण मिळवता आलेले नाही. सध्या ठाणे शहरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला असून येते तब्बल १६ ठिकाणं कोरोना हॉटस्पॉट जाहीर करण्यात आले आहेत. तसेच कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता खबरदारी म्हणून या ठिकाणी ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

First Published on: March 9, 2021 8:33 PM
Exit mobile version