नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणा, लेकीची सरकारला विनंती

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणा, लेकीची सरकारला विनंती

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात नेताजी सुभाष चंद्र बोस यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना नेताजी सुभाष चंद्र बोस यांची आठवण येणं स्वाभाविकच आहे. दरम्यान, आजच्या दिवशी सुभाषचंद्र बोस यांची मुलगी अनिता बोस फाफ यांनी भारत सरकारकडे महत्त्वाची विनंती केली आहे. नेताजींच्या अस्थी भारतात आणण्याची विनंती त्यांनी भारत सरकारकडे केली आहे. (Daughter of Subhas Chandra Bose appeals to PM Modi to bring his ‘mortal remains’ from Japan)

हेही वाचा – …न्यायाधीशांवर वैयक्तिक हल्ले होऊ नयेत, त्यांना मोकळेपणाने काम करू द्यावे – सरन्यायाधीश उदय ललित

नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ रोजी झाला. तैवानमध्ये त्यांचं अपघाती निधन झालं होतं. त्यांचे अवशेष सप्टेंबर १९४५ पासून टोकियोच्या रेन्कोजी मंदिरात जनत करण्यात आले आहेत. त्यामुळे नेताजींच्या ७३ व्या पुण्यतिथीनिमित्त भारताने नेताजींच्या अस्थी भारतात आणाव्यात अशी मागणी त्यांच्या मुलीने केली आहे. तसेच, भारताला अस्थी देण्याची मागणी त्यांनी जपान सरकारलाही केली आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना स्वतंत्र भारतात येण्याची इच्छा होती. मात्र, दुर्दैवाने त्यांची ही इच्छा पूर्ण झाली नाही. त्यामुळे निदान त्यांचे अवशेष तरी स्वतंत्र भारताच्या मातील स्पर्श करू द्या. माझे वडील धर्माभिमानी होते. त्यांच्या अस्थी गंगा नदीत विसर्जित करण्याचीही मागणी अनिता बोस म्हणाल्या.

हेही वाचा – देशातील एक असं गाव जिथे स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर पहिल्यांदाच फडकला तिरंगा

भारतातील जपानचे माजी राजदूत आणि टोकियोस्थित जपान-इंडिया असोसिएशनचे अध्यक्ष हिरोशी हिराबायाशी यांनीही नेताजींचे अस्थी भारतात घेऊन जाण्याची मागणी केली आहे.

नेताजींचे अपघाती निधन झाले होते. त्यांचा मृत्यू कसा झाला याबाबत ठोस पुरावे नाहीत. मात्र, अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या आशिस रे यांच्या पुस्तकात त्यांच्या अपघाती निधनाविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे जपानमधईल टोकियो येथील एका मंदिरात नेताजींच्या अवशेषांची डीएनए चाचणी व्हावी अशी मागणी करण्यात येतेय. या मागणीला त्यांची मुलगी अनिता बोस तयार आहेत.

First Published on: August 15, 2022 7:02 PM
Exit mobile version