महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करणे लज्जास्पद – डोनाल्ड ट्रम्प

महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करणे लज्जास्पद – डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

कोरोनाच्या या महासंकटात अमेरिकेतील ४६ वर्षीय कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइड यांच्या मृत्यूनंतर देशातील अनेक भागात हिंसक आंदोलनाला वळण लागले. दरम्यान, वॉशिंग्टन डीसी ब्लॅक लाइव्स मॅटर्सच्या काही संतप्त आंदोलनकर्त्यांनी भारतीय दूतावासाबाहेरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केली. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंदोलकांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ‘महात्मा गांधींच्या पुतळ्याचे नुकसान करणाऱ्या लोकांना लाज वाटली पाहिजे. हे अपमानास्पद कृत्य आहे.’ आंदोलनकर्त्यांनी यावेळी महात्मा गांधीच्या पुतळ्यावर स्प्रे मारला होतो आणि नुकसान केले होते.

भारतीय दूतावासाच्या समोरील रस्त्यावर २ आणि ३ जूनला रात्रीला तोडफोड करण्यात आली. भारतीय दूतवासाने कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या स्थानिक एजन्सींकडे तक्रार दाखल केली आहे. या घटनेबद्दल व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘ही घटना अपमानास्पद आहे.’

भारतीय दूतावासाने या प्रकरणाबाबत अधिक चौकशी करण्यासाठी सांगितले आहे. तसेच मेट्रोपॉलिटन पोलिस आणि नॅशनल पार्क सर्व्हिसची याबाबतची माहिती दिली आहे. सध्या पुतळ्याच्या दुरुस्तीच काम करत आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेचे दोन खासदार आणि ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेत पुतळ्याची विटंबना करण्याच्या घटनेचा निषेध केला.


हेही वाचा – १५ दिवसांत स्थलांतरित मजुरांना घरी पाठवा – सर्वोच्च न्यायालय


 

First Published on: June 10, 2020 12:05 AM
Exit mobile version