सैन्य भरतीशी निगडीत अग्निपथ योजनेची घोषणा, सैन्यात ४ वर्षांसाठी तरुणांची होणार भरती

सैन्य भरतीशी निगडीत अग्निपथ योजनेची घोषणा, सैन्यात ४ वर्षांसाठी तरुणांची होणार भरती

सैन्य भरतीशी निगडीत अग्निपथ योजनेची घोषणा, सैन्यात ४ वर्षांसाठी तरुणांची होणार भरती

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्य भरतीशी निगडीत अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. या अंतर्गत भरती झालेल्या तरुणांना अग्नीवीर असे संबोधले जाणार आहे. या याजनेमुळे रोजगासुद्धा वाढणार असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली आहे. सैन्यात ४ वर्षांसाठी भरती करण्यात येणार आहे. शॉर्ट टर्म साठी सैन्यात सामील करण्यात येईल. तीन सेवांच्या प्रमुखांनी दोन आठवड्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सैनिकांच्या भरतीसाठी अग्निपथ योजनेची माहिती दिली होती, ज्यामुळे सैनिकांना अल्प कालावधीसाठी सैन्यात सामील करण्याचा मार्ग मोकळा होईल.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. मागील काही वर्षामध्ये भारतीय सुरक्षा व्यवस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी सरकारने काही पाऊले उचलली आहेत. सुरक्षा दलाची ताकद वाढवण्यासाठी अग्निपथ योजनेची राजनाथ सिंह यांनी घोषणा केली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत सकारात्मक परिणाम या योजनेमुळे होणार असल्याचे राजनाथ सिहं यांनी सांगितले. सैन्याचे सक्षमीकरण करण्यासाठी योजना आणण्यात आली आहे.

शहीद झाल्यास अग्निवीरच्या कुटुंबाला मिळणार एक कोटी

अग्निवीरने सेवेदरम्यान शहीद झाल्यास कुटुंबाला एक कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच अपंगत्व आल्यास ४८ लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत भारतीय तरुणांना ‘अग्नीवीर’ म्हणून सशस्त्र दलात सेवा करण्याची संधी दिली जाईल. देशाची सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि आपल्या तरुणांना लष्करी सेवेची संधी देण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे.

सैन्यात भरती फक्त चार वर्षांसाठी असेल.

1. सैन्यात भरती फक्त चार वर्षांसाठी असेल.

2. चार वर्षांसाठी सेवेत घेतलेल्या जवानांचे नाव अग्निवीर असेल.

3. चार वर्षानंतर सैनिकांच्या सेवांचा आढावा घेतला जाईल. पुनरावलोकनानंतर, काही सैनिकांच्या सेवा वाढवल्या जाऊ शकतात. बाकीचे निवृत्त होतील.

4. चार वर्षांच्या नोकरीमध्ये सहा-नऊ महिन्यांचे प्रशिक्षण देखील समाविष्ट असेल.

5. निवृत्तीनंतर पेन्शन मिळणार नाही, पण एकरकमी रक्कम दिली जाईल.

6. विशेष बाब म्हणजे आता लष्कराच्या रेजिमेंटमध्ये जात, धर्म आणि प्रदेशानुसार भरती होणार नाही, तर ती देशवासी म्हणून असेल. म्हणजेच कोणत्याही जाती, धर्म आणि प्रदेशातील तरुण कोणत्याही रेजिमेंटसाठी अर्ज करू शकतात.

7. योजनेला लवकरच हिरवा सिग्नल मिळाल्यास, या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून भरती प्रक्रियेला सुरुवात होईल आणि सैन्यात (लष्कर, नौदल आणि हवाई दल) भरती सुरू होईल.


हेही वाचा : मोदी सरकारचं मोठं गिफ्ट; पुढील दीड वर्षांत 10 लाख नोकऱ्या देणार

First Published on: June 14, 2022 1:01 PM
Exit mobile version