शेतकरी आंदोलन : ‘त्या’ व्यक्तीच्या भाषणामुळे आंदोलन चिघळले – दिल्ली पोलीस आयुक्त

शेतकरी आंदोलन : ‘त्या’ व्यक्तीच्या भाषणामुळे आंदोलन चिघळले – दिल्ली पोलीस आयुक्त

एस.एन. श्रीवास्तव, दिल्ली पोलीस आयुक्त

नव्या कृषी कायद्याविरोधात प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. मात्र, या ट्रॅक्टर रॅलीला अचानक हिंसक वळण लागले. यामध्ये शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. या झटापटीत ३९४ पोलीस जखमी झाले असून यातील काही जणांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी २५ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून १९ जणांना अटक करण्यात आली आहे. तर ५० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, हे आंदोलन एका व्यक्तीमुळे चिघळल्याचा खुलासा दिल्ली पोलीस आयुक्त एस.एन. श्रीवास्तव यांनी केला आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती दिली आहे.

कोण आहे ही व्यक्ती?

एस.एन. श्रीवास्तव यांनी सांगितले की, ‘सुरुवातीला शांतपणे टॅक्टर रॅली सुरु होती. त्या दरम्यान, शेतकरी मजदूर संघर्ष कमिटीचे नेते सतनाम सिंह पन्नू यांने वादग्रस्त भाषण केले. त्या भाषणानंतर शेतकरी वेगवेगळ्या मार्गाने मार्गस्थ झाले. त्या दरम्यान, त्यांनी पोलिसांचे बॅरिकेट्स तोडण्यास सुरुवात केली आणि टॅक्टर रॅलीने हिंसक वळण घेतले. या झटापटीत अनेक पोलीस जखमी देखील झाले आहेत. मात्र, पोलिसांना सर्व अधिकार असून देखील त्यांनी संयम पाळला’.

शेतकऱ्यांनी नियमांचे केले उल्लंघन

शेतकऱ्यांच्या नेत्यांना काही नियम लिखित स्वरुपात लिहून देण्यात आले होते. त्यामध्ये सांगितले होते की, ‘टॅक्टर रॅलरी दुपारी १२ वाजता सुरु होणार. दुसर्‍या मोर्चामध्ये शेतकरी नेते नेतृत्व करणार. तसेच या रॅलीत ५ हजारपेक्षा जास्त ट्रॅक्टर घेऊन येऊ नये. तसेच शस्त्रांचा वापर केला जाऊ नये. परंतु, त्याना दिलेल्या आश्वासनाकडे आंदोलकांनी पाठ फिरविली.

आरोपींवर कठोर कारवाई होणार

टॅक्टर रॅलीत हिंसक वळण आणलेल्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच त्या घटनेचे काही व्हिडिओ देखील आमच्याकडे असून याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.


हेही वाचा – शेतकरी म्हणतात, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार


 

First Published on: January 27, 2021 9:23 PM
Exit mobile version