Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी शेतकरी म्हणतात, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार

शेतकरी म्हणतात, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार

Subscribe

शेतकऱ्यांनी माघार घेतली नसून आंदोलन सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत आंदोलन सुरु आहे. याबाबत आतापर्यंत अनेक बैठका घेण्यात आल्या मात्र, अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. याच पार्श्वभूमीवर २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. मात्र, या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. यामध्ये शेतकऱ्यांनी पोलिसांचे बॅरिकेट्स देखील तोडले या झटापटीत दिवसभरात अनेक पोलीस जखमी झाले आहेत. तर काहीजण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. मात्र, एवढे होऊन देखील शेतकऱ्यांनी माघार घेतली नसून आंदोलन सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांनी हा घेतला निर्णय

प्रजासत्ताक दिनी आंदोलकांनी काढलेल्या रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर अनेकांनी या आंदोलनावर टीकास्त्र केले. तसेच बऱ्याच जणांवर एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आंदोलन सुरुच राहणार पण, ते शांततेत केले जाणार, असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आज सिंधू बॉर्डरवर एकत्र येत शेतकऱ्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

दीप सिद्धू सरकारचा माणूस

- Advertisement -

प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तसेच सीआरपीएपच्या गाडीवरही हल्ला करण्यात आला. त्याचप्रमाणे सुरक्षा कर्मचाऱ्यांना देखील खड्यात ढकलले गेले. याबाबत शेतकऱ्यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, ‘शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काळीमा फासण्यात आला आहे. हे कृत्य आम्ही केलेले नाही. दीप सिद्धू आणि काही लोकांनी शांतपणे सुरु असलेल्या शेतकऱ्यांना बदनाम केले आहे. तसेच दीप सिद्धू हा सरकारचा माणूस आहे. ते लाल किल्ल्यापर्यंत पोहोचलेच कसे हे जाणून घेण्याची गरज आहे’.

ते गद्दार आहेत

संयुक्त मोर्चामधील शेतकरी म्हणतात की, ‘आम्ही गेल्या ६० दिवसांपासून आंदोलन करत आहोत. या आंदोलनाला काही गद्दार लोकांनी बदनाम केले आहे. लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणारे आमचे शेतकरी नाहीत. ते गद्दार लोक आहेत’.


- Advertisement -

हेही वाचा – शेतकरी आंदोलनामध्ये मोठी फूट; दोन शेतकरी गटांची आंदोलनातून माघार


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -