अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीतील मद्य व्यावसायिकाला अटक, ईडीची कारवाई

अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीतील मद्य व्यावसायिकाला अटक, ईडीची कारवाई

नवी दिल्ली – दिल्ली सरकारच्या नव्या अबकारी धोरणातील कथित घोटाळ्याबाबत बुधवारी आणखी एक कारवाई करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने दिल्लीतील मद्यसम्राट समीर महेंद्रूला अटक केली.

याआधी मंगळवारी उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्यात सीबीआयने आम आदमी पार्टीचे संपर्क प्रभारी विजय नायर यांना अटक केली होती. 17 ऑगस्ट रोजी एफआयआर दाखल झाल्यानंतर या घोटाळ्यातील ही पहिली अटक होती. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, नवीन उत्पादन शुल्क धोरणात हेराफेरी करण्यात आणि काही कंपन्यांना दारूचा पुरवठा आणि विक्री मर्यादित करण्यात नायरचा हात होता.

नायरचा उत्पादन शुल्क धोरणाशी काहीही संबंध नाही: आप

विजय नायर यांच्या अटकेवर आम आदमी पार्टीने (आप) आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते पक्षाचे संचार प्रभारी असल्याचे ‘आप’ने म्हटले आहे. नायर प्रथम पंजाबमध्ये आणि आता गुजरातमध्ये संचार धोरणे विकसित आणि अंमलबजावणीसाठी जबाबदारी आहे. त्यांचा अबकारी धोरणाशी काहीही संबंध नाही.

पक्षाने म्हटले आहे की नायर यांना यापूर्वी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते आणि मनीष सिसोदिया यांचे नाव घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. त्यानी नकार दिल्याने त्याला अटक करण्याची धमकी देण्यात आली. महिन्याभरात दोनदा त्याच्या घरावर छापे टाकण्यात आले, मात्र काहीही मिळाले नाही.

‘आप’चे राज्यसभा सदस्य संजय सिंह आणि आमदार आतिशी म्हणतात की, ‘आप’ला चिरडून गुजरात प्रचारात अडथळा आणण्याच्या भाजपच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. देशभरात ‘आप’च्या वाढत्या लोकप्रियतेमुळे भाजपला धक्का बसला आहे. नायर आणि आप नेत्यांवरचे सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत.

First Published on: September 28, 2022 11:40 AM
Exit mobile version