सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! सलग १३ व्या दिवशी पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत वाढ!

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! सलग १३ व्या दिवशी पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत वाढ!

पेट्रोल, डिझेल

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या भावात दरवाढ झालेली नव्हती. कारण या लॉकडाउनच्या कालावधीत इंधनाचा वापरही मोठय़ा प्रमाणात कमी झाला होता. मात्र गेले १३ दिवस सातत्याने पेट्रोल – डिझेलच्या दरात वाढ होत आहे. मे महिन्याच्या अखेरीस शहरामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर ६ रुपये, तर डिझेलचा प्रतिलिटर दर ६५ रुपयांच्या जवळपास होता. मात्र आज सलग तेराव्या दिवशी पेट्रोलच्या दरात ५६ पैशांची तर डिझेलच्या दरात ६३ पैशांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर ७८.३७ रूपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ७७.०६ रूपये प्रति लिटर इतके झाले आहेत.

असा आहे दराचा चढता आलेख

शुक्रवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. यानंतर

सध्या आंतरराष्ट्रीय स्तरारवर कच्च्या तेलाची किंमत कमी असली तरी देशांतर्गत बाजारात मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. सध्या इंडियन बास्केट कच्च्या तेलाच्या किंमतीत घट होऊन ते ३५ डॉलर्स प्रति बॅरलच्या जवळपास आलं आहे. गेल्या १३ दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरात ७.०९ रूपये आणि डिझेलच्या दरात ७.६७ रूपयांची वाढ झाली आहे.


हे ही वाचा – वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी एअरटेल, जिओचे स्वस्त आणि मस्त प्लॅन!


 

First Published on: June 19, 2020 8:43 AM
Exit mobile version