घरताज्या घडामोडीवर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी एअरटेल, जिओचे स्वस्त आणि मस्त प्लॅन!

वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी एअरटेल, जिओचे स्वस्त आणि मस्त प्लॅन!

Subscribe

एअरटेल आणि जिओचे जबरदस्त प्लॅन वाचा

देशात सुरू असणाऱ्या लॉकडाऊनमुळे सगळेच सध्या वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे सगळ्यांनाच जास्तीत जास्त डेटा खर्च करावा लागतो. त्यामुळे रिलायन्स जिओ आणि एअरटेलने जबरदस्त डेटा प्लॅन आणले आहेत. त्यामुळे तुम्हा ग्राहकांना आता रोज २ जीबी डेटा आणि जबरदस्त कॉलिंग प्लॅन मिळणार आहेत.

एअरटेलचा २९८ – ३९८ रुपयांचा प्लॅन

हा प्लान २ जीबी डेटाचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. २८ दिवसांसाठी हा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये युजर्संना एकूण ५६ जीबी डेटा मिळतो. ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच रोज १०० एसएमएस आणि एअरटेल थँक्स बेनिफिट्स मिळते. थँक्स बेनिफिट्समध्ये झी ५ प्रीमियम, विंक म्यूझिक आणि एअरटेल एक्स्ट्रिम या सारख्या अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. त्याचप्रमाणे ३९८ च्या प्लॅनमधील वेगळेपण म्हणेज युजर्संना अॅमेझॉन प्राईम मेंबरशीप सोबत मिळतो. बाकी सुविधा २९८ च्या प्लॅन प्रमाणेच मिळतात.

- Advertisement -

एअरटेलचा ४४९ रु आणि ६९८ रुपयांचा प्लॅन

एअरटेलचा ४४९ रुपयांच्या प्लॅन ५६ दिवसांठी आहे. या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. ग्राहकांना एकूण ११२ जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये अन्य प्लॅनप्रमाणे अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तसेच रोज १०० एसएमएस आणि एअरटेल थँक्स बेनिफिट्स मिळते. तर ६९८ हा प्लॅन ८४ दिवसाचा आहे. या प्लॅनमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. या प्रमाणे युजर्संना १६८ जीबी डेटा मिळतो.

जिओचा २४९ रुपयांचा प्लॅन

जिओचा हा सर्वात स्वस्त २ जीबीचा प्लॅन आहे. यात ग्राहकांना २८ दिवसांसाठी आहे. यात एकूण ५६ जीबी डेटा मिळतो. ग्राहकांना जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी १००० नॉन जिओ मिनिट्स मिळतात. तसेच रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते.

- Advertisement -

जिओचा ४४४ रु आणि ५९९ रुपयांचा प्लॅन

जिओचा ४४४ रुपयांचा प्लॅनची वैधता ५६ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. ग्राहकांना या प्लॅनमध्ये एकूण ११२ जीबी डेटा मिळतो. यात जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तर अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी २००० नॉन जिओ मिनिट्स मिळतात. रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते. तर ५९९ च्या प्लॅनमध्ये ८४ दिवसांसाठी आहे. यात युजर्संना १६८ जीबी डेटा मिळतो. अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी ३ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. तर जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. या शिवाय, १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते.


हे ही वाचा – ‘माझ्या मृतदेहापासून १० फूट दूर रहा’ असे लिहून कोरोना रुग्णाने घेतली फाशी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -