‘महाराष्ट्रात सुरक्षित वाटत नाही’, माजी नौदल अधिकाऱ्याच्या कुटुंबियांची भावना

‘महाराष्ट्रात सुरक्षित वाटत नाही’, माजी नौदल अधिकाऱ्याच्या कुटुंबियांची भावना

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत (POK) केली असल्याने कंगनाच्या या वक्तव्यामुळे चहू बाजूने तिच्यावर टीका केली जात आहे. तसेच तिच्या वक्तव्यावर संताप देखील व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत कंगनाने सोशल मीडियावर व्हिडीओ टाकत नसिरुद्धीन शाह आणि आमिर खान यांनी देखील ‘भारतात राहणे सुरक्षित नसल्याचे बोले होते’, असे कंगनाने व्हिडीओत म्हटले होते. त्यानंतर आता नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मा यांच्या कुटुंबाने ‘महाराष्ट्रात सुरक्षित वाटत नाही’, असे म्हटले आहे. तसेच त्यांच्या मुलाने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

नेमका काय आहे वाद?

एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारं एक कार्टून शेअर केल्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मा यांच्या कुटुंबाने महाराष्ट्रात सुरक्षित वाटत नाही, असे म्हटले आहे. तसेच त्यांचा मुलगा सनी शर्मा याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. या मारहाण प्रकरणावरुन भाजपाने शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात जोरदार मोर्चा उघडला आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार; ‘अटकेच्या कारवाईने आमचे समाधान झालेले नाही. महाराष्ट्रात आम्हाला सुरक्षित वाटत नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करुन फेरनिवडणुका झाल्या पाहिजेत’, असे मदन शर्मा यांचा मुलगा सनी शर्माने म्हटले आहे. ‘आमचा महाराष्ट्र सरकारवर विश्वास उरलेला नाही’ असे शीला शर्मा यांनी म्हटले आहे. ती मदन शर्मा यांची मुलगी आहे.

अतुल भातखळ यांनी केली विचारपूस

मदन शर्मा यांना मारहाणीत दुखापत झाली असून त्यांच्या डोळ्याला गंभीर मार लागला आहे. दरम्यान, भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी मदन शर्मा यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आहे.


हेही वाचा – कोरोना आटोक्यात आणा,नाय तर तुम्ही पुण्यात दिसणार नाहीत!


 

First Published on: September 12, 2020 5:54 PM
Exit mobile version