धक्कादायक! रुग्णाच्या पोटातून काढले चक्क १२२ खिळे

धक्कादायक! रुग्णाच्या पोटातून काढले चक्क १२२ खिळे

प्रातिनिधिक फोटो

मानसिक रुग्णांची काळजी घेणे आवश्यक आहे. आपण काय करत आहोत याचे भान मानसिक रुग्णांना नसते. त्यामुळे अनेकदा ते नकळत इतरांना त्रास देतात. मानसिक रुग्ण नेहेमीच असाधारण गोष्टी करत असतात. याचेच एक उदाहरण नुकतेच आपल्या समोर आले आहे. अफ्रिकेतील इथियोपिया येथे एका मानसिक रुग्णाने खिळे खाल्याचे समोर आले.  रुग्णाच्या पोटात दुखत असल्याने डॉक्टरांकडे घेऊन गेले असता त्याच्या पोटातून तब्बल १२२ खिळे काढण्यात आले. याचबरोबर चार सेफ्टी पिन्स, दात साफकरण्याच्या काड्या आणि काचेच्या ग्लासाचे तुकडे ही डॉक्टरांनी त्याच्या पोटातून काढले आहेत. ३३ वर्षीय हा रुग्ण सध्या धोक्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सुदैवाने रुग्णाच्या पोटाच्या आतडीला काही इजा झाली नाही.

काय म्हणतात डॉक्टर  

हा मानसिक रुग्ण सुदैवी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पोटात खिळे, काचेचे तुकडे आणि टोकेदार वस्तू असूनही इजा झाली नाही. “पाण्याच्या सहाय्याने हा मानसिक रुग्ण या टोकेदार वस्तू खात होता. त्यामुळे या वस्तू थेट त्याच्या पोटात गेल्या. या वस्तूंमुळे त्याला आंतरिक इजा झाली नाही अन्यथा प्रादुर्भाव होऊन रुग्ण दगावण्याची शक्यता होती. मागील दहा वर्षांपासून या रुग्णाला मानसिक त्रास होता. मागील दोन वर्षांपासून त्याने गोळ्या घेणे थांबवले होते. गोळ्यां ऐवजी हा रुग्ण खिळे आणि टोकेदार वस्तू खात होता”- सेंट पीटर हॉस्पिटलचे डॉक्टर

First Published on: October 23, 2018 3:47 PM
Exit mobile version