राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना केले ‘Legion of Merit’ ने सन्मानित

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना केले ‘Legion of Merit’ ने सन्मानित

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रतिष्ठित ‘लीजन ऑफ मेरिट’ म्हणून गौरविले. हे पदक पंतप्रधान मोदींना भारत-अमेरिकेची रणनीतिक भागीदारी वाढविण्यासाठी आणि भारताला जागतिक शक्ती म्हणून उदयास येण्यासाठी देण्यात आले. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट सी. ओब्रायन यांनी ही माहिती दिली. ओब्रायन यांनी ट्वीट करून असे सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचे नेतृत्व आणि भारत-अमेरिकेची रणनीतिक भागीदारी वाढवली त्याबद्दल ‘लीजन ऑफ मेरिट’ ने सन्मानित केले. अमेरिकेत भारतीय राजदूत तरणजीतसिंग संधू यांनी पंतप्रधान मोदी यांच्या वतीने पदक स्वीकारले.

‘लीजन ऑफ मेरिट’ म्हणजे…

कॉंग्रेसने २० जुलै १९४२ रोजी ‘लीजन ऑफ मेरिट’ पदक देण्याची सुरूवात केली. यूएस आर्मी, परदेशी लष्करी सदस्य आणि राजकीय व्यक्तिमत्त्वांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. ज्यांनी उत्कृष्ट सेवा आणि कार्य करताना अपवादात्मक आणि कौतुकास्पद आचरण केले असेल असा व्यक्तीना ‘लीजन ऑफ मेरिट’ ने गौरवण्यात येते. परदेशी अधिकाऱ्यांना देण्यात येणारे हे सर्वोच्च लष्करी पदकांपैकी एक आहे.

पंतप्रधान मोदींना ‘या’ देशांनीही केले सन्मानित

भारतीय पंतप्रधानांना सर्वोच्च पुरस्कार देणारा अमेरिका हा पहिला देश आहे. यापूर्वी २०१६ मध्ये सौदी अरेबियाने ‘ऑर्डर ऑफ अब्दुलाज़ीझ अल सौद’, ‘ स्टेट ऑर्डर ऑफ गाझी आमिर अमानुल्ला खान’ ‘ (२०१६), ‘ग्रँड कॉलर ऑफ स्टेट ऑफ पॅलेस्टाईन अवॉर्ड ‘(२०१८)’,संयुक्त अरब अमिरातीकडून ‘ऑर्डर ऑफ झाएद’, २०१९ मध्ये रशियाने दिलेला ‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू’ पुरस्कार तर मालदीवकडून २०१९ मध्ये ‘ऑर्डर ऑफ डिस्टिंग्विश्ड रुल ऑफ निशान इज्जुद्दीन’ या सर्व पुरस्काराने सन्मानित केले आहे.


Corona: ब्रिटनमधून भारतात इनकमिंग बंद, विमानसेवा स्थगित
First Published on: December 22, 2020 8:48 AM
Exit mobile version