कर्करोगावर जालीम उपाय सापडला? १८ रुग्णांवर केलेले ट्रायल सहा महिन्यांत यशस्वी

कर्करोगावर जालीम उपाय सापडला? १८ रुग्णांवर केलेले ट्रायल सहा महिन्यांत यशस्वी

कर्करोगासारखा आजार झाल्यास त्यावरील उपचार वर्षांनुवर्षे सुरू राहतात. हा आजार पूर्णपणे बरा झाल्यानंतर पुन्हा  उलटण्याची शक्यता असते. त्यामुळे कर्करोग झाल्याचे समजताच अनेक रुग्णांचं मानसिक खच्चीकरण होतं. पण चमत्कार वाटावा असा एक प्रयोग अमेरिकेत घडला आहे. प्रायोगिक तत्तावर केलेल्या उपचारांनी अवघ्या सहा महिन्यात गुदाशयाचा कर्करोग (Rectal Cancer) नाहीसा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे (Dostarlimab) औषध खरोखरच कॅन्सरवरील रामबाण उपाय ठरू शकतं यासंदर्भात वैद्यकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाल्या आहेत. (Dostarlimab Vanishes Rectal Cancer Miraculously In Patients For First Time In Medical History)

एका लहान क्लिनिकल चाचणीत डॉस्टारलिमॅब (Dostarlimab) हे औषध १८ रुग्णांना देण्यात आले होते. औषध प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेले हे औषध रेणंपासून बनवण्यात आले आहे. पर्यायी प्रतिपिंडप्रमाणे (Antibodies) हे औषध मानवी शरीरात काम करतं. गुदाशयाच्या कर्करोगाने (Rectal Cancer) ग्रासलेल्या १८ रुग्णांवर प्रायोगिक तत्तवार ही चाचणी करण्यात आली. चमत्कार म्हणजे सर्व रुग्णांवर ही चाचणी यशस्वी ठरली असून त्यांचा कर्करोग पूर्णपणे नष्ट झाला आहे. चाचणी संपल्यानंतर केलेल्या तपासणीत त्यांच्या शरीरात कर्करोगाची कोणतीही गाठ नसल्याचं समोर आलं.

हेही वाचा – कोरोनाविरोधी mRNA अमेरिकन लस करते कर्करोगापासून संरक्षण, जाणून घ्या लशीची उपयुक्तता

चाचणी पूर्ण झाल्यानंतर रुग्णांची एंडोस्कोपी (Endoscopy), पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी (Positron Emission Tomography), पीईटी स्कॅन (PET Scan), एमआरआय स्कॅन (MRI Scan) करण्यात आले. या स्कॅनिंगनंतर रुग्णांमध्ये कोणत्याच प्रकारची गाठ आढळली नाही. असा प्रकार कर्करोगाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला असल्याचं न्यूयॉर्कच्या मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरचे डॉ. लुईस ए. डायझ जे. यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – परफ्युमचा अतिवापर आरोग्यासाठी अपायकारक, होऊ शकतो कर्करोग

पहिल्याच टप्प्यात यश

प्रायोगिक तत्तावर करण्यात आलेल्या चाचणीमध्ये औषधासोबतच रुग्णांना केमोथेरपी (Chemotherapy), रेडिएशन (Radiation) आणि शस्त्रक्रियासुद्धा (Operation) करण्यात आल्या होत्या. तसेच, याच्या पुढील टप्प्यात रुग्णांना आतडी, मूत्रपिंड आणि लैंगिकतेसंदर्भातील समस्या निर्माण होऊ शकतील, असा इशारा रुग्णांना देण्यात आल्या होत्या. मात्र, या १८ रुग्णांनी हा धोका पत्करून चाचणीला सुरुवात केली. पण आश्चर्य म्हणजे पुढील टप्प्यात जाण्याआधीच पहिल्याच टप्प्यात रुग्ण कर्करोगमुक्त झाले आहेत.

कर्करोगावरील उपचार करताना शरीरामध्ये अनेक लक्षणीय गुंतागुंत होते. अनेक उपचारप्रक्रीया कर्करोगाच्या रुग्णाला आतून पोखरून काढतात. मात्र, या पद्धतीमध्ये रुग्णांना फारसा त्रास झाला नाही. त्यामुळे या संशोधकांचे कौतुक व्हायला हवं असं, कॅलिफोर्निया विद्यापीठातील कोलोरेक्टल कॅन्सर तज्ज्ञ डॉ. अ‍ॅलन पी. वेनूक म्हणाले.

… म्हणून झाले शक्य

प्रायोगिक तत्वासाठी ज्या १८ रुग्णांची निवड झाली होती त्यांचा कर्करोग मर्यादित स्वरुपात होता. म्हणजेच पहिल्या पातळीवर होता. त्यांचा कर्करोग इतर अवयवांमध्ये पसरला नव्हता. त्यामुळे ही उपचार पद्धत यशस्वी झाली असल्याची माहिती मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर आणि पेपरच्या सह-लेखिका, ऑन्कोलॉजिस्ट डॉ. आंद्रिया सेरसेक यांनी दिली.

कशी होती प्रक्रिया

चाचणीसाठी रुग्णांना सहा महिन्यांसाठी दर तीन आठवड्यांनी डॉस्टारलिमॅब दिले जात होते. तसेच, त्यांच्यावर केमोथेरपी, रेडिएशन आणि शस्त्रक्रियासुद्धा करण्यात आल्या होत्या.

First Published on: June 8, 2022 1:30 PM
Exit mobile version